ETV Bharat / city

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती - Former Prime Minister Dr. Manmohan Singh

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाच्या समस्येमुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉ.मनमोहन सिंग
डॉ.मनमोहन सिंग
author img

By

Published : Oct 13, 2021, 7:16 PM IST

Updated : Oct 13, 2021, 8:33 PM IST

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाच्या समस्येमुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील उपचारासाठी एम्सने बनवली टीम

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडली. त्याला श्वास घेण्यात अडचण येत होती आणि सतत छातीत दाब येत असल्याची तक्रार होती. यानंतर त्यांना तत्काळ एम्सच्या सीएन टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एम्स रुग्णालय डॉ.मनमोहन सिंग यांच्या तपासासाठी एक मेडिकल टीम बनवली आहे, ज्याचे नेतृत्व एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया करणार आहेत.

कालपासून मनमोहन सिंग यांना ताप येत होता

ताप आणि अशक्तपणाची तक्रारीनंतर माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना आज संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना राजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. मनमोहन सिंग कालपासून ताप असल्याची तक्रार करत होते. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना अत्यावश्यक द्रवपदार्थ दिले जात आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे

डॉ. मनमोहन सिंग यांना झाली होती कोरोनाची लागण

डॉ. मनमोहन सिंग, हे 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधान होते. त्यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. मनमोहन सिंग यांना साखरेचा त्रास आहे. माजी पंतप्रधान सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली, तर त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया 2009 मध्ये एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही बातमी सतत अपडेट केली जात आहे.

Last Updated : Oct 13, 2021, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.