ETV Bharat / city

मुंबईतील आणखी एका व्यापाऱ्याने परमबीर सिंगांबद्दल केला गौप्यस्फोट, वाचा.... - परमबीर सिंग वसुली प्रकरण

मुंबईतील व्यापारी बिमल अग्रवाल यांनी एक गौप्यस्पोट केला आहे. सचिन वाझे यांनी आपला एक बॉस परमबीर सिंग असल्याचे म्हटले होते, अशी माहिती बिमल अग्रवाल यांनी पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा अडचणीत आले आहेत.

Parambir Singh latest news
मुंबईतील एका व्यापाऱ्याने परमबीर सिंगांबद्दल केला गौप्यस्पोट
author img

By

Published : Aug 21, 2021, 3:54 PM IST

Updated : Aug 22, 2021, 4:37 AM IST

मुंबई - तथाकथीत वसूली प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मुंबईतील व्यापारी बिमल अग्रवाल यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे यांनी आपला एक बॉस परमबीर सिंग असल्याचे म्हटले होते, अशी माहिती बिमल अग्रवाल यांनी पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा अडचणीत आले आहेत. तसेच यावेळी अग्रवाल यांनी भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांचा देखील उल्लेख केला आहे. यासोबतच पोलीस दलात दाखल होण्यापूर्वीच सचिन वाझे यांनी अनेक व्यापारी, बारमालक यांच्याशी संपर्क केला होता, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

मुंबईतील आणखी एका व्यापाऱ्याने परमबीर सिंगांबद्दल केला गौप्यस्फोट

काय आहे बिमल अग्रवालची तक्रार?

बिमल अग्रवाल यांनी तक्रारीत असं म्हटलं आहे, की 'जानेवारी-फेब्रुवारी २०२० पासून ते मार्च 2021 या काळात आरोपींनी माझ्याकडून 9 लाख रुपये वसूल केले आहेत. माझा पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथं BOHO रेस्टॉरन्ट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोर अँड आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते'.

गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384 ,385 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. गुन्ह्यात परमबीर सिंह, सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज पाटील यांची नावं आहेत. याप्रकरणी सुमित सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. बोरीवली न्यायालयाने आरोपीला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

क्रिकेट बुकींनी केला होता वसुलीचा आरोप -

काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस स्थानकात परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. बुकी प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप जालान यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ख्याती मिळवलेल्या प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान यांनी केला होता. एवढेच नाही तर आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडूनदेखील सव्वा कोटींची वसुली केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे आणि एन.टी कदम सारख्या अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता. सद्या राजकुमार कोथमिरे यांची बदली गडचिरोली येथे झाली असली तरी त्यांच्याविरोधातदेखील आपण तक्रार देणार असल्याचे जालान यांनी सांगितले होते. तसेच विमल अगरवाल, जुबेर अन्सारी सारखे पोलिसांचे एजन्ट ही सगळी वसुली करत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

आरोपांमुळे व्हावे लागले होते पायउतार -

परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुल करून देण्याचा दबाव टाकल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

हेही वाचा - नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंना धक्का; ठाणे न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

Last Updated : Aug 22, 2021, 4:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.