ETV Bharat / city

Param Bir Singh Suspended : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अखेर निलंबन - maharashtra Param bir Singh suspended

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Former Commissioner of Police Param bir Singh ) यांचा अखेर आज निलंबन ( Suspended ) करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यावर अनेक खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Param Bir Singh
Param Bir Singh
author img

By

Published : Dec 2, 2021, 5:01 PM IST

Updated : Dec 2, 2021, 5:46 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Former Commissioner of Police Param bir Singh ) यांना अखेर आज निलंबन ( Suspended ) करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंग यांच्या निलंबनाच्या फाइलवर सही केली होती. त्यानंतर आज अखेर त्यांना निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी स्वाक्षरी केल्यानंतर निलंबनाची फाइल पुढील प्रक्रियेसाठी राज्याच्या गृहविभागाकडे ( State Home Ministry ) पाठवली जाणार असून निलंबनाचा आदेश राज्याच्या गृह विभागाकडून केंद्रीय गृह विभागाकडे ( Central Home Ministry ) पाठवण्यात येणार आहे. परमबीर सिंग 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यामुळे हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

परमबीर सिंग यांना अँटिलिया प्रकरणानंतर 17 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य होमगार्ड दलाचे जनरल कमांडर बनवण्यात आले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या वसुली प्रकरणात त्यांना अनेक वेळा समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, सिंग काही हजर राहिले नाही. त्यामुळे मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषीत केले होते. अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी परमबीर सिंग यांची चौकशी केली. गेल्या काही महिन्यांपासून सिंग हे ड्युटीवर नव्हते. शिवाय खात्यातीलच सहकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यामुळे अखेर त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वीच बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे. असे स्पष्ट केले होत याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर गायब

अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सिंग यांची बदली गृहरक्षक दलाचे महानिदेशक म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर सुरुवातीला वैद्यकीय रजेवर गेलेले परमबीर त्यानंतर कोणतीही सूचना न देता कार्यालयात ५ मेपासून अनुपस्थित होते. न्यायालयाने त्यांना १७ नोव्हेंबरला फरार घोषित केले. 6 महिन्यांपासून अज्ञात वसात असलेल्या परमबीर सिंग देशातून फरार झाले असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. २५ नोव्हेंबरला ते चंदीगड येथून विमानाने मुंबईत आले.

हेही वाचा - Pawar Support to Mamata - Fadnavis : काँग्रेसला बाजूला ठेवून मोट बांधण्यात ममतांना पवारांची साथ - फडणवीस

Last Updated : Dec 2, 2021, 5:46 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.