ETV Bharat / city

BMC Nalasfai Issue Mumbai : भाजपाला नालेसफाई कामाच्या पाहणीची घाई झाली; माजी महापौरांचा टोला - भाजपा नालेसफाई मुंबई पाहणी

नालेसफाईत दरवर्षी ( Nalasfai Mumbai ) घोटाळा झाल्याचा आरोप केला जातो. यंदा भाजपाकडून गेले आठवडाभर नालेसफाईच्या ( BJP Mumbai Nalasfai Review ) कामाचा आढावा घेऊन पोलखोल केली जात आहे. त्यावर भाजपाला नालेसफाई पाहण्याची घाई झाली, असा टोला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Former Mayor Kishori Pednekar ) यांनी लगावला आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर
माजी महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Apr 13, 2022, 6:51 PM IST

Updated : Apr 13, 2022, 7:07 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई होऊ नये, म्हणून पालिका नालेसफाई करते. नालेसफाईत दरवर्षी ( Nalasfai Mumbai ) घोटाळा झाल्याचा आरोप केला जातो. यंदा भाजपाकडून गेले आठवडाभर नालेसफाईच्या ( BJP Mumbai Nalasfai Review ) कामाचा आढावा घेऊन पोलखोल केली जात आहे. त्यावर भाजपाला नालेसफाई पाहण्याची घाई झाली, असा टोला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Former Mayor Kishori Pednekar ) यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक ( Meeting of former corporators Shiv Sena ) आज (बुधवारी) मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रतिक्रिया देताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर

शिवसेना नगरसेवकांची बैठक : मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे सुरु झाली आहेत. या कामांची पाहणी भाजपाकडून केली जात आहे. नाल्यात गाळ असताना सत्ताधारी फरार असा आरोप भाजपाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. गेले आठवडाभर केलेल्या नालेसफाईच्या कामांचा अहवाल भाजपाकडून पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची एक बैठक मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीत नालेसफाई, प्रशासकीय कार्यकाळातील विभागामधील कामे, पालिका निवडणूक तयारी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीबाबत सांगताना आज बऱ्याच दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक एकत्र आले आहेत. आम्ही सध्या नगरसेवक नसलो तरी आमची जबाबदारी संपलेली नाही. आमची नाळ मुंबईकरांसोबत जोडली आहे. रस्त्यांची कामे सुरु आहेत, नाल्यांमधील गाळ काढला जात आहे. त्या कामाची पाहणी करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर इन्कम टॅक्स धाड पडल्याने ते अनुपस्थित आहेत का असा प्रश्न विचारल्यावर जाधव त्यांच्या वैयक्तिक कामामुळे आले नाहीत, असे स्पष्टीकरण पेडणेकर यांनी केले.

'काहीही मॅनेज होत' : विक्रांत युद्ध नौकेला स्मारक बनवण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया यांच्याकडून पैसे गोळा करण्यात आले. ते पैसे सरकारकडे जमा झाले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यावर सोमैया यांना उच्च न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. यावर बोलताना आता जे काही आपण पाहतो ते सर्व वेगवेगळं घडत आहे. सध्या काहीही मॅनेज होत, असा आरोप पेडणेकर यांनी केला आहे. यावेळी काहीही मॅनेज होत पण मी कोर्ट म्हणत नाही, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.

'पाहणी करण्याची घाई' : भाजपाकडून पक्ष स्थापनेच्या निमित्ताने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. यावेळी नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यात आली. पाहणी केल्यावर कंत्राटदार आणि सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करण्यात आले आहे. सत्ताधारी फरार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर बोलताना भाजपाने नालेसफाईबाबत पाहणी करण्याची खूप घाई केली. नालेसफाई १५ एप्रिल नंतर सुरु होते. भाजपाला नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्याची घाई झाली, असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.

हेही वाचा - Sharad Pawar : पुरंदरेंच्या माहितीवरून जेम्स लेनने आक्षेपार्ह लिखाण केले : शरद पवारांचे राज ठाकरेंना प्रत्त्युत्तर

Last Updated : Apr 13, 2022, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.