मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते क्वारंटाईन झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सांगितले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी ट्विटद्वारे केले आहे.
-
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.
">लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.
देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी ट्विटरवरून केले आहे.
राज्यातील या नेत्यांनाही झाला होता कोरोना -