ETV Bharat / city

Malegaon BombBlast Case : माजी तपास अधिकाऱ्यावर ओढावली एनआयए न्यायालयातून बाहेर जाण्याची नामुष्की

निवृत्त एटीएस अधिकारी कुलकर्णी यांना विरोध न करणारे आणि या खटल्यातील आरोपी क्रमांक 5 यांनी हा संपूर्ण खटला वानखेडे स्टेडियममध्ये चालवण्याची विनंती कोर्टात केली आहे. कोर्टात जे सुरू आहे त्याची माहिती सर्वांना मिळावी. त्यामुळे भारतीय नागरिकाला न्यायल्याने बंदी घालू नये, अशी मागणी केली. आरोपी क्रमांक 5 समीर कुळकर्णी हे स्वतः आपला बचाव कोर्टात करत आहेत.

दिवाणी न्यायालय
दिवाणी न्यायालय
author img

By

Published : Jan 27, 2022, 5:08 PM IST

Updated : Jan 27, 2022, 5:24 PM IST

मुंबई - मालेगाव स्फोट प्रकरणात राज्य सरकारकडून या प्रकरणाचे तपास केलेले अधिकारी कुलकर्णी यांना दैनंदिन सुनावणी वेळी उपस्थित राहण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. त्यानुसार ते आज (गुरुवारी) सत्र न्यायालयातील एनआयए न्यायालयात आले असता इतर आरोपींनी त्यांना तिथे उपस्थित राहण्यासाठी विरोध केला. नंतर न्यायालयाने त्यांना जाण्याचे आदेश दिले. यामुळे तपास अधिकाऱ्याला बाहेर जाण्याची नामुष्की ओढावली आहे.

प्रतिक्रिया देतांना मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपी

मालेगाव स्फोटमधील दहशतवाद विरोधी पथकाच्या तपास अधिकाऱ्याला आज कोर्टाच्या बाहेर जाण्याची नामुष्की आली आहे. मालेगाव ब्लास्ट प्रकरणामधील अनेक साक्षीदार होस्टईल होत असल्याने या प्रकरणावर प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. म्हणून आज निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आणि मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणातील तपासी अधिकारी आज विशेष न्यायालयात उपस्थित राहिले होते. मात्र त्यांना आरोपी क्रमांक 5 वगळता प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वकील आणि कर्नल पुरोहित यांच्या वकिलांना त्यांना उपस्थित राहिल्याबद्दल आक्षेप घेतला. कुलकर्णी यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वतः कोर्टाच्या बाहेर जाणे पसंद केले. मात्र न्यायल्याने आपण आपले लेखी पत्र द्या यावर कोर्ट निकाल देईल, असे सांगितले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आणि एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल याबाबतच्या मौखिक आदेशानंतर निवृत्त एटीएस एसीपी अधिकारी मालेगाव खटला प्रकरण सुनावणी दरम्यान कोर्टात उपस्थित राहिले होते. मात्र त्यांना आज कोर्टात विरोध झाला. तर निवृत्त एटीएस अधिकारी कुलकर्णी यांना विरोध न करणारे आणि या खटल्यातील आरोपी क्रमांक 5 यांनी हा संपूर्ण खटला वानखेडे स्टेडियममध्ये चालवण्याची विनंती कोर्टात केली आहे. कोर्टात जे सुरू आहे त्याची माहिती सर्वांना मिळावी. त्यामुळे भारतीय नागरिकाला न्यायल्याने बंदी घालू नये, अशी मागणी केली. आरोपी क्रमांक 5 समीर कुळकर्णी हे स्वतः आपला बचाव कोर्टात करत आहेत.

2008 मध्ये झाला होता बॉम्बस्फोट

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटार सायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर याही या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, महाविकास आघाडीचा चक्काजाम, गडकरींचे आश्वासन

Last Updated : Jan 27, 2022, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.