मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्थिक गैरव्यवहाराबद्दल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबत ईडीने नुकताच देशमुख यांच्या नागपूर येथील निवास्थानी छापा टाकला होता. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीमार्फत सांगण्यात आले. मात्र, आपल्या वकीलामार्फत आपण चौकशीला हजर राहू शकत नाही, असे देशमुख यांनी कळवले होते.
ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीचे समन्स
आता अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे चिरंजीव ऋषीकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या विरोधात कोणतीही जबरदस्तीची कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे. तसेच, आपण सर्व चौकशीला सहकार्य करु. मात्र, चौकशी का केली जात आहे हे स्पष्ट करावे असेही देशमुख म्हणाले आहेत.