मुंबई - 100 कोटी कथित वसुली (100 crore extortion case ) तथा मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case ) अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांनी वकीलाच्या मार्फत आज (मंगळवार) मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
100 कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात नमूद केले आहे.
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचं टार्गेट (100 crore extortion case) दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
Money laundering case : अनिल देशमुख यांचा मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज, बुधवारी सुनावणी
100 कोटी कथित वसुली (100 crore extortion case )तथा मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case )अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh)यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अनिल देशमुख यांनी वकीलाच्या मार्फत आज (मंगळवार) मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.