ETV Bharat / city

param bir singh property - फरार माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची मालमत्ता किती? जाणून घ्या.. - परमबीर सिंग मालमत्ता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा फरार घोषित केलेले परमबीर सिंह (param bir singh property) यांची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. फरार घोषित केल्यानंतर जर एक महिन्याच्या आत ते तपास यंत्रणांच्या समोर हजर झाले नाहीत तर, त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई क्राईम ब्रांचकडून होऊ शकते. त्यांची मालमत्ता कोठे आणि किती आहे, हे जाणून घेऊया.

param bir singh property information
परमबीर सिंग यांची मालमत्ता
author img

By

Published : Nov 21, 2021, 3:39 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा फरार घोषित केलेले परमबीर सिंह (param bir singh property) यांची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. फरार घोषित केल्यानंतर जर एक महिन्याच्या आत ते तपास यंत्रणांच्या समोर हजर झाले नाहीत तर, त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई क्राईम ब्रांचकडून होऊ शकते. त्यांची मालमत्ता कोठे आणि किती आहे, हे जाणून घेऊया.

हेही वाचा - Corona Update : राज्यात शनिवारी 2271 रुग्णांना डिस्चार्ज, 833 नवे रुग्ण तर 15 रुग्णांचा मृत्यू

परमबीर सिंगच्या पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या स्थावर मालमत्तेची सरकारकडे नोंद आहे. परमबीर सिंह यांची स्थावर मालमत्ता पुढील प्रमाणे आहे.

१) हरियाणामधील फरिदाबाद या ठिकाणी एक शेतजमीन. या शेतजमिनीची किंमत १९९७ साली २२ लाख रुपये इतकी होती. या जमिनीचे मालक स्वत: परमबीर सिंग आहेत. आपल्या डिक्लेरेशनमध्ये त्यांनी स्वत: सांगितले आहे की, त्यांना या जमिनीतून दरवर्षी ५१ हजार रुपये मिळतात.

२) मुंबईच्या जुहू परिसरात एक फ्लॅट आहे. तो त्यांनी २००३ साली ४८.७५ लाख रुपयांना खरेदी केला होता. आज त्याची किंमत जवळपास ४.६४ कोटी रुपये इतकी आहे. या संपत्तीमधून त्यांना दरवर्षी २४ लाख ९५ हजार रुपये मिळतात.

३) नवी मुंबईमधील नेरूळ परिसरात त्यांचा एक फ्लॅट आहे. त्याची खरेदी २००५ साली 3 कोटी ६० लाख ३० हजार रुपयांना केली होती. या संपत्तीत त्यांची पत्नी सविता सिंग यांचा शेअर असून त्यांना वर्षाला यातून ९.६० लाख रुपये मिळतात.

४) चंदीगडमध्ये ४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये त्यांच्या दोन भावांचाही वाटा आहे.

५) हरियाणामध्ये फरिदाबाद या ठिकाणी त्यांची एक जमीन आहे. या जमिनीची खरेदी २०१९ साली १४ लाख रुपयांत करण्यात आली होती. ती एकूण ४००.३८२ स्क्वेअर यार्ड इतकी आहे. ही संपत्ती परमबीर सिंग यांच्या नावावर आहे.

कोठे आहेत परमबीर सिंह?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex home Minister Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर ईडीने तपास करून अनिल देशमुख यांना अटक केली. आरोप केल्यानंतर आपल्याकडे या संदर्भातली पुरावे नाहीत, असे सांगत परमबीर सिंग यांनी देशाबाहेर पलायन केल्याची चर्चा आहे. सध्या ते बेल्जियममध्ये असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी परमबीर सिंग यांना फरार घोषित केले आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई करताना त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाऊ शकते.

मालमत्ता जप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया

एखादा गुन्हेगार अथवा आरोपी सापडत नसेल किंवा अटक टाळण्यासाठी पळ काढत असेल तर, अशावेळी संबंधित गुन्हेगाराची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. भारतीय संविधान कायद्यानुसार कलम 81 आणि 82 अन्वये ही कारवाई करता येते. आरोपीच्या घरावर पोलीस वॉरंट चिकटवितात. परमबीर सिंग यांच्या नावावर अनेक घरे आहेत. त्यामुळे, या सर्व ठिकाणी वॉरंट चिटकविण्यात येऊ शकते. पोलीस त्यांच्या सर्व मालमत्तांचा पंचनामा करतील, तसेच परमबीर सिंग यांच्यावरील कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जाहीरही करण्यात येईल. पोलिसांकडून निर्धारित तारखेपर्यंत वाट पाहून मालमत्तेची जप्तीची कारवाई करण्यासाठी न्यायालयात परवानगीसाठी अर्ज दाखल केला जाईल.

बेनामी मालमत्ता सुद्धा चर्चेत

परमबीर सिंग यांनी समृद्धी महामार्गालगत नाशिक येथे बेनामी जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे. त्यांचा निकटवर्तीय असलेल्या पुनमियाच्या नावाने या जमिनींची खरेदी झालेली आहे. त्यामुळे, आता या सर्व मालमत्तांवर पोलीस टाच आणण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे ‘टार्गेट’ दिल्याचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांना त्यांचा ठावठिकाणा उघड करण्यास सांगितले आहे आणि म्हटले आहे की, ते देशाच्या किंवा जगात कोणत्या भागात आहेत, हे सांगितल्यानंतरच अटकेपासून संरक्षणासाठी सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होईल.

हेही वाचा - Antilia bomb scare case : क्रिकेट बुकी नरेश गौर यांना एनआयए कोर्टाकडून जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.