मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh ) आज (दि. 29) चांदीवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) हजर झाले होते. यावेळी तब्बल 8 महिन्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे ( Sachin Waze ) एकमेकांसमोर आल्याने चर्चेला उधाण आला आहे.
उद्योजक मुकेश अंबानींच्या ( Mukesh Ambani ) मुंबईतील घराबाहेर स्फोटके आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज सचिन वाझेच्या अटकेनंतर तब्बल 8 महिन्यानंतर परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यामुळे काही सेकंदांच्या भेटीत या दोघांमध्ये काय बोलणे झाले. याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्यावर परमवीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर चांदीवाल आयोगाकडून या प्रकरणाचाही तपास सुरू आहे. या प्रकरणातही सचिन वाझेचे नाव आलेले आहे. त्यामुळे आज परमवीर सिंह आणि सचिन वझे यांची चौकशी आमने-सामने होणार आहे. यावेळी हे दोघेही तब्बल आठ महिन्यानंतर एकमेकांच्या समोर आले आहे. परमवीर सिंह यांनी सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी बार रेस्टॉरंट यांच्याकडून वसुली कराचे टारगेट दिला होता, असा गौप्यस्फोट परमवीर सिंग यांनी पत्राद्वारे केला होता.
काय आहे प्रकरण..?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हे ही वाचा - MH Assembly Winter Session : विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू