ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार विदेशी भाषेचे धडे - mumabi

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकवण्याच्या मागणीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा शिकता येणार आहेत.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर
author img

By

Published : Jul 31, 2019, 11:11 AM IST

मुंबई - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकता याव्यात म्हणून अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा शिकवल्या जाणार आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकवण्याच्या मागणीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा शिकता येणार आहेत. यासंदर्भातील माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई महापालिका शाळांमधून गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांना एक वेळचे जेवणही योग्य प्रमाणात मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना पालिकेकडून मोफत शिक्षण दिले जाते. शाळेसाठी लागणारे कपडे, बूट, वह्या पुस्तके आदी वस्तू विद्यार्थ्यांना दिल्या जातात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालिकेकडून एसईपी, सेमी इंग्रजी, डिजिटल वर्ग व व्हर्च्युअल क्लासरूम आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत.

जगात उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या प्राप्तीसाठी इंग्रजीचे महत्व समजून शिक्षण खात्याने या भाषेसाठी ब्रिटिश कौन्सिलशी संबंधित प्रशिक्षण प्रकल्प सुरू केला आहे. विदेशात जाऊन नोकरी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. त्यासाठी परदेशी भाषेचे ज्ञान आवश्यक असून त्या भाषा बोलता याव्या लागतात. अशा भाषा बोलता न आल्याने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होते.

विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळता यावे म्हणून अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा पालिका शाळांमधून शिकवण्याची मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी केली होती. त्या मागणीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मागणीचा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून मंजुरी नंतर या भाषा पालिका शाळांमधून शिकवल्या जाणार आहेत.

Intro:मुंबई - 
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकता याव्यात म्हणून अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा शिकवल्या जाणार आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिकवण्याच्या मागणीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पालिका आयुक्तांचा अभिप्रायानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा शिकता येणार आहेत. Body:मुंबई महापालिका शाळांमधून गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांना एक वेळचे जेवणही योग्य प्रमाणात मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना पालिकेकडून मोफत शिक्षण दिले जाते. शाळेसाठी लागणारे कपडे, बूट, वह्या पुस्तके आदी वस्तू विद्यार्थ्यांना दिल्या जातात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालिकेकडून एसईपी, सेमी इंग्रजी, डिजिटल वर्ग व व्हर्च्युअल क्लासरूम आदी उपक्रम राबवण्यात आले आहेत.

जगात उच्च शिक्षण व रोजगाराच्या प्राप्तीसाठी इंग्रजीचे महत्व समजून शिक्षण खात्याने या भाषेसाठी ब्रिटिश कौन्सिलशी संबंधित प्रशिक्षण प्रकल्प सुरू केला आहे. विदेशात जाऊन नोकरी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. त्यासाठी परदेशी भाषेचे ज्ञान आवश्यक असून त्या भाषा बोलता याव्या लागतात. अशा भाषा बोलता न आल्याने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होते. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळता यावे म्हणून अरेबिक, रशियन, फ्रेंच आणि स्पॅनिंश या भाषा पालिका शाळांमधून शिकवण्याची मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक पालिकेतील रईस शेख यांनी केली होती. त्या मागणीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मागणीचा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून मंजुरी नंतर या भाषा पालिका शाळांमधून शिकवल्या जाणार आहेत.

महापौरांची बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.