मुंबई - गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच 51 दशलक्ष टन मालवाहतूक जलमार्गाने केल्याचा नवा विक्रम सागरी महामंडळाने केला आहे. विशेष म्हणजे या मालवाहतुकीतून 140 कोटींचा महसूस राज्य सरकारला तिजोरीत जमा झाले आहे. याशिवाय यंदा सागरी महामंडळाचा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यंदा अनेक साखरी प्रकल्प यशस्वी झालेली आहे. या बाबतीत भारतचा हा खास रिपोर्ट...
सागरी महामंडळ मालामाल - सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, सागरी महामंडळाची स्थापना झाली तेव्हापासून पहिल्यांदाच 51 दशलक्ष टन मालवाहतूक जलमार्गाने केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात राज्यातून जलमार्गाने 51 दशलक्ष टन मालवाहतूक करून सरासरी 140 कोटी रुपयांचा महसूल गोळाला केला आहे. गेल्या काही वर्षापासून राज्याच्या किनारपट्टी आणि किनारपट्टीच्या पाठीमागील प्रदेशाला आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून जल मार्ग मालवाहतुकीचे चालना देण्याकरिता सागरी महामंडळाने मोठ्या प्रमाणांत बंदरांचा विकास केला आहेत. विशेष म्हणजे जलवाहतूक हा तुलनेने स्वस्त आणि पर्यावरणपूरक मार्ग असल्याने राज्यातील सागर किनाऱ्यावरील जेट्टीचा विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच 51 दशलक्ष टन मालवाहतूक जलमार्गाने होऊ शकली आहे.
समुद्र मार्गाने मालवाहतूक -
वर्ष दशलक्ष टन महसूल
- 2017-18 - 37.4 77.67 कोटी
- 2018-19 - 45.8 85.30 कोटी
- 2019-20 - 43.7 107.14 कोटी
- 2020-21 - 39.8 129. 74 कोटी
- 2021-22 - 51.0 140. 61 कोटी
13.6 दशलक्ष टन मालवाहतूक वाढली - सागरी महामंडळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात डाहून, बेलापूर, करंजा, दिघी, रत्नागिरी, जयगड, दाभोळ, विजयदुर्ग, वाशी, ट्रोम्बे, बँकॉट सारख्या 15 मालवाहतूक बंदरे आहे. या बंदरातून कोळसा, एलपीजी, एलनजी, सिमेट, साखर, युरिया सारखे अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात जल मार्गाने मालवाहतूक केली जाते. 2017-18 या राज्यातील समुद्र मार्गाने 37.4 दशलक्ष टन मालवाहतूक केली होती. आता मालवाहतूक 51 दशलक्ष टनचा घरात पोहचली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात 51 दशलक्ष टन मालवाहतूकीतून केली आहेत. गेल्या तीन वर्षांत 13.6 दशलक्ष टन जल मार्गाने मालवाहतूक वाढली आहेत.
वॉटर टॅक्सी सुसाट - सागरी महामंडळाकडून जल वाहतुकीला चालना देण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहे. त्यापैकी एक म्हणजे मुंबई बेलापूर आणि बेलापूर एलिफंटा या दोन मार्गावर हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा सुरू झालेले आहे. बेलापुर ते एलिफंटा या मार्गावर हाय स्पीड वॉटर टॅक्सी सेवेला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसातच बेलापुर ते एलिफंट यादरम्यान वॉटर टॅक्सीमधून 1 हजार 500 पेक्षा जास्त पर्यटकांनी प्रवास असल्याची माहिती सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ईटीव्ही भारतला दिली आहेत.