ETV Bharat / city

महत्त्वाची बातमी..! जोगेश्वरी विक्रोळी उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण, उद्यापासून वाहतुकीसाठी खुला - जोगेश्वरी विक्रोळी उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ( Jogeshwari Vikroli Link Road ) उड्डाणपुलाच्या ( Flyover ) विविध ठिकाणी सांधे उभारण्यासाठी तब्बल 12 दिवस उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( Mumbai Metropolitan Region Development Authority ) घेतला होता. मात्र, नियोजित वेळात्रकाच्या दोन दिवसापूर्वीच काम पूर्ण करण्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ( Maharashtra State Road Development Corporation ) यश आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहेत

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 21, 2022, 7:49 PM IST

मुंबई - जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ( Jogeshwari Vikroli Link Road ) उड्डाणपुलाच्या ( Flyover ) विविध ठिकाणी सांधे उभारण्यासाठी तब्बल 12 दिवस उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( Mumbai Metropolitan Region Development Authority ) घेतला होता. मात्र, नियोजित वेळात्रकाच्या दोन दिवसापूर्वीच काम पूर्ण करण्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ( Maharashtra State Road Development Corporation ) यश आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहेत.

वेळेआधीच काम पूर्ण - पूर्व द्रुतगती मार्गावरील ( East Expressway ) जोगेश्वरी-विक्रोळी उड्डाणपूल रविवारी सकाळी सहा वाजेपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात येत आहे. नियोजित वेळात्रकाच्या दोन दिवस आधीच काम पूर्ण करण्यात यश आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत जोगेश्वरी-विक्रोळी उड्डाणपुलाचे सांधे बदलण्यासाठी 13 मेपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी 24 मेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक दिला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामंडळाने कंत्राटदाराला वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, शनिवारी काम पूर्ण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी मंजूर केलेल्या वेळापत्रकाच्या दोन दिवस आधीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रविवारी ( दि. 22 मे) सकाळी सहा वाजल्यापासून उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात येईल.

पुलाखालून वाहतूक सुरू राहणार - या उड्डाणपुलाच्या 200 बेअरींग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. वाहतूक बंद न करता बेअरींग बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 200 पैकी 148 बेअरींग बदलण्यात आले होते. जितके बेअरींग बदलण्यात आले आहेत, त्या भागातील सांधे बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत जोगेश्वरी-विक्रोळी उड्डाणपुलाचे सांधे बदलण्यासाठी 13 मेपासून वाहतूक बंद करण्यात आली होते.

हेही वाचा - Sunday Night Megablocks : रविवारी मध्य - पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.