ETV Bharat / city

क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणात माश्या; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार - m ward chembur

महानगरपालिका मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी विविध ठिकाणी इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनची सोय करण्यात आली आहे.

quarantine centres in mumbai
क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणात माश्या; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार
author img

By

Published : Jun 4, 2020, 2:57 PM IST

Updated : Jun 4, 2020, 3:19 PM IST

मुंबई - महानगरपालिका मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी विविध ठिकाणी इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनची सोय करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी क्वरंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याचे समोर आले आहे. चेंबूर एम वेस्टमध्ये पालिकेचे क्वारंटाइन सेंटर आहे. यामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या आणि माश्या सापडल्याचे समोर आले आहे. हे अन्न सेवन केल्यानंतर लहान मुलांना उलट्या झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे पालिका पुरवत असलेल्या सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच नागरिकांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्या आहेत.

क्वारंटाइन सेंटरमध्ये जेवणात माश्या; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानंतर नागरिकांना क्वारंटाइन करण्यात येते. शहरात ठिकठिकाणी बीएमसी वार्डात क्वारंटाइन सेंटर स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये किमान चांगल्या गाद्या, बेड, सॅनिटायझर, हॅन्डवॉश आदी प्राथमिक गोष्टींची सोय असणे गरजेचे आहे. मात्र या क्वारंटाइन सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर विदारक वास्तव समोर आले आहे.

या ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना नाश्ता व जेवणाची सोय उपलब्ध करण्याची जबाबदारी महानगरपालिका वॉर्ड ऑफिसरची आहे. यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र चेंबूरच्या एमवॉर्ड कक्षातील घटना पाहता क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची गैरसोयच समोर आलीय.

या प्रकारानंतर 'ईटीव्ही भारत'ने एम वॉर्ड अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. संबंधित प्रकरणाबाबत योग्य तो तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच लोकांची गैरसोय होणार नाही, असे असे ते म्हणाले.

Last Updated : Jun 4, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.