मुंबई - मुंबईत रविवारी पाच दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले (Five Day Ganesh Immersion in Mumbai) आहे. रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईतील २९, २९९ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी १२,१९७ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या दरम्यान चोख पोलीस बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने (BMC Disaster Management Department ) दिली.
२९२९९ मूर्तींचे विसर्जन - मुंबईमध्ये दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार Corona Lockdown असल्याने सर्व सण निर्बंधांमध्ये साजरे करावे लागले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने यंदा निर्बंध हटवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये दहीहंडी नंतर गणेशोत्सव सण निर्बधमुक्त वातावरणात साजरा केला जात आहे. मुंबईत रविवार ४ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ५ दिवसांच्या सार्वजनिक ६८७, घरगुती ३८५८५ व हरतालिका २७ अशा एकूण २९२९९ मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक स्त्रोत्रात करण्यात आले. त्याचप्रमाणे कृत्रिम तलावात सार्वजनिक ३२३, घरगुती ११८५२, १६ हरतालिकांचे अशा एकूण १२१९७ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.
महापालिकेकडून सोयी सुविधा - मुंबईमध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) १० दिवस धूमधडाक्यात साजरा केला जातो. आज पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आहे. यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality Ready for Ganesha Immersion) पूर्ण तयारी केली होती. महापालिकेने १५२ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले असून ६३ नैसर्गिक स्थळी महापालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. श्री गणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन (Ganesha idol immersion online registration) नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा Environment complementary idol पर्यावरण पूरक मूर्ती, सजावटीसाठी टिशू पेपर आणि कागदी पुठ्याचा वापर