मुंबई - औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरमधील कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान तालुकाध्यक्ष संजय विठ्ठलराव जाधव यांनी पाच नगरसेवकांसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. दोन आठवडे आधी मालेगावच्या 28 काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) प्रवेश केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश पुन्हा एकदा काँग्रेसला "दे धक्का" समजला जातोय.
![Five corporators including former mayor of Gangapur Sanjay Jadhav joined NCP, joined NCP in the presence of Ajit Pawar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ajitpawar-7209727_10022022172849_1002f_1644494329_1.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. राज्यात महाविकास आघाडी तीन पक्षाचे सरकार असले तरी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असे सूचक वक्तव्य कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला फार महत्वाच्या असून आपल्या पक्षाकडे महत्त्वाची खाती आहेत. त्या माध्यमातून आपल्याला विकासात्मक कामे करायची आहेत. औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे असा आत्मविश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रवेशकर्त्यांना दिला.
यावेळी कॉंग्रेसचे गंगापूर तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर नगरपरिषदेचा गटनेता सुरेश नेमाडे, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, योगेश पाटील, अशोक खाजेकर, मोहसीन चाऊस, माजी नगरसेवक सचिन भवार, अमोल जगताप, राकेश कळसकर, गुलाम शहा, हासिफ बागवान, सय्यद अख्तर, इद्दू खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश भडके, अविनाश सोनवणे, कैलास शेंगुळे, राजेंद्र दंडे, अण्णासाहेब पाठे, प्रविण बाराहाते, रवींद्र सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य शारंधर जाधव, तुकाराम सटाले, माजी युवक तालुकाध्यक्ष उमेश बाराहाते, दिनेश गायकवाड, सोपान देशमुख, सलिम खान, सलीम पटेल, बाबू मनियार आदींचा समावेश आहे.
हेही वाचा : Ajit Pawar Critics on Central Government : गुजरातमधून किती रेल्वे सुटल्या ते पहावे - अजित पवार