मुंबई - मुंबई सेंट्रलस्थित पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात नेत्ररोग टीमने शिवणरहित प्रक्रियेचा वापर करून 65 वर्षीय रुग्णाचे काॅर्नियल प्रत्यारोपण केले. ज्यामुळे रुग्णाची दृष्टी बरी झाली आहे. जगजीवन राम रुग्णालयात पहिल्यांदाच काॅर्नियल प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचे अवघे 782 रुग्ण; तर 2 जणांचा मृत्यू
यशस्वी प्रत्यारोपण
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, मल्टिस्पेशालिस्ट रुग्णालयांना काॅर्नियल प्रत्यारोपण प्रक्रियेसाठी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत मान्यता देण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी रोजी काॅर्नियलमधील केस टू केस कन्सल्टंट स्पेशालिस्ट डाॅ. रसिका ठाकूर आणि त्यांच्या टीमने प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले. 65 वर्षीय महिला रुग्णाला मागील 10 वर्षांपासून तिच्या डाव्या डोळ्याचे अंधत्व आले होते. जगजीवन राम रुग्णालयाला नेत्रपेढी समन्वय आणि संशोधन केंद्राकडून उच्च ऑप्टिकल दर्जाचे दात्याचे ऊतक मिळाले. हे प्रत्यारोपण एका प्रकारच्या लॅमेलर कॉर्नियल प्रत्यारोपणाद्वारे केले जाते.
रुग्णालयाने पूर्ण काळजी घेतली -
डेसेमेटच्या स्ट्रिपिंग एंडोथेलियल केराटोप्लास्टी जे कॉर्नियल प्रत्यारोपणाचे एक प्रगत आणि अत्यंत कार्यक्षम सिट्यूलेस तंत्र आहे. ज्यामुळे रुग्णाची दृष्टी जलद पुनर्प्राप्ती होते. या प्रक्रियेनंतर रुग्ण बरा होतो. पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयाच्या टीमने रुग्णांची काळजी आणि वैद्यकीय उपचार प्रदान करण्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
हेही वाचा - MNS Amit Thackeray : मराठी भाषा गौरव दिनी मनसेचा मोठा निर्णय; अमित ठाकरेंकडे दिली नवी जबाबदारी