मुंबई : नॉन एसी मधील फर्स्टक्लास लोकल रेल्वेचा पास एसी मध्ये मान्य करावा. त्याला मान्यता मिळावी यासाठी हजारो प्रवाशांची मागणी होती .आणि अखेर मध्ये रेल्वेने ( Central Railway ) त्याबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. आता फर्स्ट क्लास साठी ज्या प्रवाशांनी पास काढलेला असेल. त्यांना तो पास अपग्रेड करून एसीसाठी प्रवेश खुला असेल . ( First class pass will be valid for AC local )
एसी लोकल सर्वांसाठी खुली करा: एकीकडे एसी लोकल मुळे ती लोकल रद्द करावी म्हणून मागणी होते. तर एसी लोकल सामान्य लोकांच्या दरामध्ये करावी आणि सर्वांसाठी खुली करा; अशी देखील मागणी स्वराज इंडियाकडून केली जात आहे. त्याबद्दल ठिकठिकाणी मोहीम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आता निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी प्रथम श्रेणीचा रेल्वेचा पास काढलेला असेल. आता त्यांना एसी लोकलमध्ये प्रवेश करता येईल. फक्त तो पास तुम्हाला रेल्वे कडून अपग्रेड करून घ्यावा लागेल.
पास करावा लागणार अपग्रेड : यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांच्यासोबत ईटीव्ही भारत द्वारा संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की ,आता मध्य रेल्वेच्या सर्व लोकल मधील फर्स्ट क्लास पास काढलेल्या प्रवाशांना एसी लोकलमध्ये प्रवेश मिळू शकेल. मात्र त्यासाठी पास अपग्रेड करावा लागणार.
कोणी आणि कसा करायचा पास अपग्रेड : पास अपग्रेड करावा म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरादाखल मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल जैन ( Anil Jain Chief PR Officer Central Railway ) यांनी पुढे नमूद केले की, समजा तुमचा पास फस्ट क्लासचा रेल्वेचा 1000₹ चा असेल आणि तुम्हाला ज्या ठिकाणाहून रोज प्रवास सुरु करायचा आहे आणि ज्या ठिकाणी उतरायचं आहे. तिथलं एसी लोकलच भाडं समजा दोन हजार असेल .तर उरलेला जो फरक आहे तो फरक तुम्हाला रेल्वे तिकीट खिडकीवर जाऊन भरावा लागेल. तो भरून पास अपग्रेड करू शकतात. तसेच ही सवलत केवळ त्रैमासिक ,सहामासिक आणि वार्षिक पास काढणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठीच आहे. असे देखील त्यांनी अधोरेखित केले.