मुंबई : गोवंडीतील बैगनवाडी परिसरातील रोड नंबर-14 येथे समाजवादी पक्षाचे नेते बहादूर शेख यांच्या घरावर गोळीबार झाल्याच्या Firing at Samajwadi Party leader Bahadur Sheikh house वृत्ताने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, शिवाजी नगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलीस फॉरेन्सिक विभागाचीही मदत घेत असून तपासानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. मात्र, प्राथमिक तपासात हा गोळीबार दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वॉर्ड क्रमांक १३४ च्या सपाचे अध्यक्ष बहादूर शेख यांनी सांगितले की, ते काही कामानिमित्त दुपारी २ वाजता बीएमसी कार्यालयात गेले होते. त्यावेळी घरातून फोन आला की, कोणीतरी घरावर गोळीबार केला असून खिडकीला छिद्र पडले आहे. घरी आल्यानंतर त्यांना काचेच्या खिडकीला एक गोल छिद्र दिसले, त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाच्या मदतीने स्थानिक शिवाजी नगर पोलिसांना माहिती दिली.