मुंबई - मानखुर्द पूर्व येथील मंडाला परिसरात भंगाराच्या गोदामाला मोठी आग लागली. मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथे झोपडपट्टीच्या बाजूला भंगार जमा करून ठेवले होते. घटनास्थळी अग्निशमनच्या दलाच्या १५ ते १६ गाड्या पोहोचल्या आहेत. आगीचं स्वरुप भीषण असल्याने आणखीही गाड्या रवाना करण्यात येणार आहेत.मात्र, आगीचं कारण अस्पष्ट असून शेजारीच डंपिंग ग्राऊंड असल्याचे समजते. ही आग आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास लागली. ही लेव्हल तीन ची आग असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी हजर झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मानखुर्द येथील मंडाळा येथे गोडाऊनला आग लागली असून ही आग आज दुपारी 2. 40 वाजता लागली. त्यावेळी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस दलाचे कर्मचारी हजर झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑइलच्या गोडाऊनला आग लागलेली आहे
आग पसरत असल्याने भीती -
मंडाला परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. येथील मायाक्का देवीच्या मंदिरा शेजारील एका दुकानात आग लागली आणि पुढे ही आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली. दुपारी 2:40 च्या सुमारास आग लागली. परिसरात दाटीवाटीने झोपडपट्टी असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाले. आगीचं स्वरुप भीषण असून अग्निशमन दलाच्या तब्बल ८ गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत. याच बरोबर शेजारील लाकडाची दुकाने आणि अन्य सामान सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहेत. आग मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.