मुंबई - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल ही लोकल वाशी स्थानकात येताच लोकलच्यावर पेंटाग्राफमध्ये आज(बुधवार) सकाळी 9. 33 वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. सध्या आग नियंत्रणात असून लोकल रिकामी करून कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. मात्र, पेंटाग्राफवर आग पाहताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.
हेही वाचा - जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?
एका अज्ञात व्यक्तीने पेंटाग्राफवर बॅग फेकल्याने आग लागल्याची घटना घडल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. यामुळे जवळपास 12 मिनिटं या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे ऐन सकाळी वर्दळीच्या वेळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.