ETV Bharat / city

मालाड पठाणवाडी येथे लाकडी गोडाऊनला आग, कोणीही जखमी नाही

मालाड पठाणवाडी येथे एका लाकडी गोडाऊनला सायंकाळी आग लागली होती. ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला साडेपाच तास लागले. रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

author img

By

Published : Nov 6, 2020, 7:50 PM IST

Updated : Nov 7, 2020, 3:24 AM IST

fire broke out at a wooden godown at Malad
मालाड पठाणवाडी येथे लाकडी गोडाऊनला आग

मुंबई - मालाड पठाणवाडी येथे एका लाकडी गोडाऊनला शुक्रवारी सायंकाळी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तब्बल साडेपाच तासांनी आग विझवली. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

आगीवर नियंत्रण -

मालाड पठाणवाडी येथे मल्लिका हॉटेलजवळील एका लाकडी गोडाऊनला सायंकाळी 5.52 वाजता आग लागली. लाकडी गोडाऊनला आग लागल्याने तसेच हा परिसरात दाटीवाटीचा असल्याने अग्निशमन दलाने घटनास्थळी 7 फायर इंजिन, 6 जम्बो टँकर पाठवले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून 6 वाजून 51 मिनिटांनी ही आग लेव्हल 2 ची असल्याचे घोषित केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री 8.51 वाजता या आगीवर नियंत्रण मिळवले. आग नियंत्रणात असली तरी आग विझवण्याचे काम सुरूच होते. अखेर तब्बल साडेपाच तासांनी म्हणजेच रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

दोषींवर कारवाई -

गेल्या दोन महिन्यात मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या आगी अग्निशमन दल आणि पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे लागत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. दरम्यान मुंबईमधील आगीची चौकशी केली जाणार असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

Last Updated : Nov 7, 2020, 3:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.