ETV Bharat / city

निसर्ग चक्रीवादळ; मुंबई अग्निशमन दल सज्ज, फ्लड रेस्क्यू जवान तैनात - निसर्ग चक्रीवादळ वृत्त मुंबई

अग्निशमन दलाकडे आपत्कालीन परिस्थितीत सर्व लागणाऱ्या अवजारांसह ६३ वाहने तसेच ५ रेस्क्यू वाहने आहेत. निसर्ग वादळामुळे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी अग्निशमन दल सज्ज असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभातकुमार रहांगदळे यांनी दिली.

Mumbai
सज्ज असलेले अग्निशमन दल
author img

By

Published : Jun 2, 2020, 11:58 PM IST

मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ मुंबईत येत आहे. या वादळादरम्यान मोठा पाऊस पडून पाणी साचल्यास किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी मुंबई अग्निशमन दल सज्ज असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभातकुमार रहांगदळे यांनी दिली.

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय पाणी साचणार्‍या ठिकाणीही आवश्यक पंप बसवण्यात आले आहेत. तसेच मुंबईच्या सहा चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्ड, रेस्क्यू बोट, जेट की आणि अग्निशमन दलाचे १५० फ्लड रेस्क्यू जवान आवश्यक साधनसामग्रीसह तैनात ठेवण्यात आले आहेत.

मुंबई अग्निशमन दलाकडे पावसाळयात आपत्कालीन परिस्थितीमध्ये झाडे पडणे, घर कोसळणे, शॉकसर्किट होऊन आग लागणे, दरड कोसळणे अशा तक्रारी येतात. त्यासाठी मुंबई अग्निशमन दलाची ३५ केंद्र आहेत. अग्निशमन दलाकडे आपत्कालीन परिस्थितीत सर्व लागणाऱ्या अवजारांसह ६३ वाहने तसेच ५ रेस्क्यू वाहने आहेत. निसर्ग वादळामुळे काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी अग्निशमन दल सज्ज असल्याची माहिती रहांगदळे यांनी दिली. मुंबई अग्निशमन दलाने गिरगाव, दादर, जुहू वर्सोवा, अकसा आणि गोराई या ठिकाणी समुद्र किनारी आपल्या टीम तैनात केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.