ETV Bharat / city

फायर बाईक, मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक दाखवा; स्थायी समिती सदस्यांची मागणी

मुंबईमधील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आगी लागल्यास त्या ठिकाणी त्वरित पोहोचून आग विझवता यावी यासाठी मुंबई अग्निशमन दलाने २४ फायर बाईक्स विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या बाईक कशा आहेत आणि बाईकच्या किमतीपेक्षा त्यावरील यंत्रांची किंमत जास्त का? असे अनके प्रश्न उपस्थित करत या बाईकचे प्रात्यक्षिक स्थायी समिती सदस्यांना द्यावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.

author img

By

Published : Oct 27, 2021, 10:32 PM IST

ravi raja on fire bike mumbai
फायर बाईक यंत्र किंमत

मुंबई - मुंबईमधील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आगी लागल्यास त्या ठिकाणी त्वरित पोहोचून आग विझवता यावी यासाठी मुंबई अग्निशमन दलाने २४ फायर बाईक्स विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या बाईक कशा आहेत आणि बाईकच्या किमतीपेक्षा त्यावरील यंत्रांची किंमत जास्त का? असे अनके प्रश्न उपस्थित करत या बाईकचे प्रात्यक्षिक स्थायी समिती सदस्यांना द्यावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्षांनी या बाईकचे व मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलाला दिले.

पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा

हेही वाचा - पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यांसाठी 774 कोटी मदत

बाईकचे प्रात्यक्षिक दाखवा -

मुंबईमध्ये दररोज आगी लागण्याच्या घटना घडतात. आगी लागल्यावर त्या त्वरित बुझवता याव्यात यासाठी मुंबई अग्निशमन दलाने आपल्या ताफ्यात २४ केंद्रांवर फायर बाईक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या फायर बाईक एन्फिल्ड बुलेट ३५० सीसी आहेत. या एका बाईकची किंमत १ लाख ३० लाख इतकी आहे. तर त्यावर अग्निशमन यंत्रणा, आग विझवण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाक्या बसवण्यासाठी १० लाख २२ हजार इतका असा एकूण सुमारे १२ लाख खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. यावर बोलताना याआधी अग्निशमन दलामध्ये फायर रोबोट आणला होता. फायर रोबोटचा प्रयोग फसला आहे. यामुळे आता फायर बाईक आणल्या जाणार आहेत. मुंबई अग्निशमन दलाची ३४ केंद्र आहेत. त्यापैकी २४ केंद्रांमध्ये या फायर बाईक आणल्या जाणार आहेत. या बाईकची किंमत आणि त्यावर लावण्यात येणारी यंत्रणा यांची किंमत पाहता हा नागरिकांच्या करामधून हा खर्च होणार आहे. हा खर्च वाया जाऊ नये म्हणून या बाईक कशा काम करणार आहेत, झोपडपट्ट्या आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये त्या कशा प्रकारे आग विझवणार आहेत याचे प्रात्यक्षिक नगरसेवकांना व स्थायी समिती सदस्यांना दाखवावे, अशी मागणी रवी राजा यांनी केली.

आम्हाला अग्निशमन दलाच्या जवानांचा आदर आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या कार्यलयात बसून योग्य काम होत नाही. अग्नी सुरक्षा यंत्रणा योग्य आहे का? याची पाहणी केली जात नसल्याने आगीच्या घटना घडतात. त्यासाठी सर्व इमारतींमध्ये मॉक ड्रिल करावी जेणेकरून कोणती अग्नी सुरक्षा यंत्रे सुरू आहेत, हे समोर येईल, असे रवी राजा म्हणाले.

मार्गदर्शक तत्वानुसारच बाईक

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही या बाईक कशा प्रकारे काम करणार आहेत, याचे प्रात्यक्षिक दाखवण्याची मागणी केली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी आगी लागल्यावर टॉवरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होतो, याचे भान ठेवून काम करावे, अशी मागणी केली. यावर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी फायर बाईकना परवानगी नव्हती यामुळे त्या दलामध्ये आणण्यात आल्या नव्हत्या. मार्चमध्ये त्याला परवानगी मिळाली असून त्या अग्निशमन दलाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असल्याने त्या आता खरेदी केल्या जाणार आहेत. या बाईकचे प्रात्यक्षिक नगरसेवकांना दाखवण्यात येईल, अशी माहिती भिडे यांनी दिली. यावर या फायर बाईक्स कशा आहेत. मॉक ड्रिल कशी केली जाते, ते आम्हाला दाखवावे. हायराईज इमारतीमध्ये यंत्रणा असणे गरजेचे आहे, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फायर बाईक विकत घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

हेही वाचा - तरुणांना ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी युवक काँग्रेस राबवणार अभियान!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.