ETV Bharat / city

Winter Session 2021 : कर्जपूर्ती करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये परतावा देणार - अजित पवार

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांला सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यात खंड पडला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचा परतावा ( Reimbursement of Rs. 50,000 to Farmers ) दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार ( Finance Minister Ajit Pawar ) यांनी विधानसभेत केली.

अर्थमंत्री अजित पवार
अर्थमंत्री अजित पवार
author img

By

Published : Dec 24, 2021, 12:40 PM IST

Updated : Dec 24, 2021, 1:07 PM IST

मुंबई - राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ( Mahatma Jyotiba Phule Scheme ) अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना महामारीमुळे यात खंड पडला असला तरी या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा परतावा ( Reimbursement of Rs. 50,000 to Farmers ) दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार ( Finance Minister Ajit Pawar ) यांनी विधानसभेत केली.

सभागृहात बोलतांना अर्थमंत्री अजित पवार
  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील दोन लाखांपर्यंत कर्ज कसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जांची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने जाहीर केला होता. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांना परतावा देता आला नव्हता. मात्र अशा सर्व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये परतावा निश्चित देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) सभागृहात दिली. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भातील प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना तीन लाखपर्यंत पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा सरकारचा विचार असून त्यासंदर्भात लवकरच कार्यवाही केली जाईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यात प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -MH Assembly Winter Session 2021 : आदित्य ठाकरे धमकी प्रकरणी एसआयटी स्थापन करणार - गृहमंत्री

Last Updated : Dec 24, 2021, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.