ETV Bharat / city

अखेर ऑटो रिक्षा चालकांचा संप मागे; सरकारशी सकारात्मक चर्चा

मुंबईसह राज्यातील एकूण २० लाख रिक्षा चालक-मालकांनी संप पुकारला होता. विविध मुद्दांवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघाल्याने राज्यव्यापी रिक्षाबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कामगार नेते शंशाक राव यांनी सांगितले.

अखेर ऑटो रिक्षा चालकांचा संप मागे
author img

By

Published : Jul 9, 2019, 7:59 PM IST

मुंबई - रिक्षा भाडेवाढीसह राज्यातील अवैध वाहतुकीस आळा घालणे तसेच रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करणे या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारत्मक आश्वासन दिले आहे. त्यामुळे चर्चेतून तोडगा निघाल्याने राज्यव्यापी रिक्षाबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कामगार नेते शंशाक राव यांनी सांगितले.

अखेर ऑटो रिक्षा चालकांचा संप मागे

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या मागण्या रास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी चर्चेत सांगितले आहे. रिक्षा चालकांसाठी आठ दिवसात महामंडळ गठित होईल तसेच कल्याणकारी योजनांसाठी रिक्षाचालक संघटना प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती तीन महीन्यात सरकारला अहवाल सादर करणार आहे.

अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी भरारी पथकांची राज्यभर नेमणूक करण्याचेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ओला- उबरला आमचा कायदेशीर विरोध असून सरकारने बेकायदा असलेल्या ओला-उबरवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली होती. शशांक राव पुढे म्हणाले, संप कालच मागे घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून सरकारशी सातत्याने चर्चा सुरु होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासने दिली असल्याने आता आंदोलनाची आवश्यकता नाही. तसेच बैठकीला परिवहन मंत्री उपस्थित नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

भाडेवाढीसंदर्भात बोलताना राव म्हणाले, आम्ही हकीम कमिटीची अंमलबजवणी करावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालू असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाली असून कल्याणकारी महामंडळाचे गठन व्हावे आणि त्यामाध्यमातून इतर योजना राबवाव्या अशीही मागणी यावेळी करण्यात आली. मुक्त रिक्षा परवाने बंद झाले पाहिजेत कारण रिक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. मुंबईसह राज्यात एकूण २० लाख रिक्षा चालक-मालक असून यापैकी सुमारे ९५ टक्के रिक्षा चालक-मालकांनी रिक्षा संपाला पाठिंबा दिला होता.

Intro:Body:mh_mum_01_shashankrao_Autostrike__cm_meet_vis_7204684

रिक्षाचालकांसाठी आठ दिवसात महामंडळ स्थापन करणार: शशांक राव

अवैध प्रवासी वाहतूकबाबत कायमस्वरूपी भरारी पथके

मुंबई: रिक्षाभाडेवाढीसह राज्यातील अवैध वाहतुकीस आळा घालणे, रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करणे या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारत्मक आश्वासमं दिली असून चर्चेतून तोडगा निघाल्यानं राज्यव्यापी रिक्षाबंद मागे घेण्यात आल्याचे कामगार नेते शंशाक राव यांनी सांगितले.

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या मागण्या रास्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी चर्चेत सांगितले असून रिक्षाचालकांसाठी महामंडळ आठ दिवसात गठित होईल, तसेच कल्याणकारी योजनासाठी रिक्षाचालक संघटना प्रतिनिधींचा समावेश असलेली समिति तीन महीन्यात सरकारला अहवाल सादर करण्यात येईल.

अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी भरारी पथकांची राज्यभर नेमणुक करण्याचेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ओला- उबेरला आमचा विरोध कायदेशीर असून सरकारने बेकायदा ओला- उबेरवर कारवाईचे आश्वासन राव यांनी दिले.

शशांक राव म्हणाले,संप कालच मागे घेतला आहे, गेले महिनाभर व्यवहार सातत्याने केले आहेत. आता CM ने आश्वासने दिली आहेत. तेव्हा आता सध्यातरी येणाऱ्या काळात आंदोलनाची आवश्यकता नाही.

परिवहन मंत्री का उपस्थित नव्हते हे मला माहित नाही, मात्र ते स्वतः हजर रहाणार आहेत असं काल आलेल्या पत्रात नमूद केलं होतं असं राव म्हणाले.

भाडेवाढीसंदर्भात बोलताना राव म्हणाले, आम्ही हकीम कमिटीची अंमलबजवणी अशी मागणी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालू असं आश्वासन दिलं आहे.
मुख्यमंत्री सोबत कृती समितीची बैठक झाली, सकारात्मक चर्चा झाली.कल्याणकारी महामंडळचे गठन व्हावे, यामध्यमातून इतर योजना राबवता याव्यात अशी मागणी होती.

यावर आम्हाला 8 दिवसांत गठन करू असं आश्वासन दिलं. याची अंमलबजवणी कशी केली जाईल याबाबत एक समिती स्थापन केली जाईल जी 3 महिन्यात निर्णय देईल.

अवैध प्रवासी वाहतूकबाबत एक कायमस्वरूपी भरारी पथक असावं प्रत्येक शहरात स्थापन केली जाईल असं याबाबत आश्वासन दिलं.

मुक्त रिक्षा परवाने बंद झाले पाहिजेत कारण रिक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.

मुंबईसह राज्यात एकूण २० लाख रिक्षा चालक-मालक असून यापैकी सुमारे ९५ टक्के रिक्षा चालक-मालकांनी रिक्षा संपाला पाठिंबा दिला होता. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.