मुंबई: मुंबईत फोर्ट परिसरात द पारशी लाईन लाईंग इन हॉस्पिटल ही १०० वर्षांहून जुनी इमारत आहे. या इमारतीमध्ये पालिकेच्या परवानगी न घेता चित्रपटाचे शूटिंग सुरू ( Film Shooting without permission In Old Building) असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केली आहे. (Shooting without permission MMC Notice)
विना परवानगी शूटिंग : फोर्ट परिसरात ए के नायक रोडवर द पारसी लाईंग इन हॉस्पिटल ही इमारत आहे. १०० वर्षांहून जुनी ही इमारत आहे. या इमारतीमध्ये अनेकवेळा चित्रपटाच्या शूटिंग होतात. आताही एका चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. शूटिंगच्या वेळी बांधकामामध्ये करण्यात येणाऱ्या बदलामुळे इमारत कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेच्या ए विभाग कार्यालयाकडे तसेच पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. या इमारतीमध्ये विनापरवानगी शूटिंग सुरू असल्याने यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर करावी, अशी मागणी संजय गुरव यांनी केली आहे.
कागदपत्रे तपासली जाणार : दरम्यान याबाबत पालिकेच्या ए विभाग कार्यालयाशी संपर्क साधला असता, इमारत मालकाकडे लायसन्स नसताना शूटिंगला परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. इमारतीच्या मालकाला याबाबतची कागदपत्रे सादर करायला सांगितली आहेत. कागदपत्रे सादर केल्यावर त्याची तपासणी करून त्यानंतर पुढील कारवाई करू अशी माहिती प्रभारी सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव यांनी दिली.