ETV Bharat / city

संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - अतुल भातखळकर - भाजपची संजय राऊत यांच्यावर टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

File treason case
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
author img

By

Published : Dec 27, 2020, 5:17 PM IST

मुंबई - भाजप आणि शिवसेना हा वाद काही नवीन नाही. वेळोवेळी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्र सरकारसह भाजप नेतृत्वावर टीका करण्यात येते. त्यात आज पुन्हा शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत, देशातील राज्य फुटतील अशी खरमरीत टीका केली. यावर भाजप नेत्यांनी देखील राऊत यांच्यावर टीका करत फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन दिल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

संजय राऊतांची सामनामधून केंद्र सरकारवर टीका -

पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात मात्र हा विचार मारला जात आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस फोडून भाजपने सरकार बनवलं. बिहारात तेजस्वी यादव या तरुणाने आव्हान उभे केले. कश्मीर खोऱ्यात अस्थिरता कायम आहे. लडाखमध्ये चीन घुसलेलाच आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांवर जोर जबरदस्तीचे प्रयोग सुरू आहेत. कंगना राणावत व अर्णब गोस्वामीला वाचविण्यासाठी केंद्रीय सरकार जमिनीवर उतरले. मुंबईची मेट्रो राजकीय अहंकारासाठी अडवून ठेवली. राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही, असं म्हणत केंद्र सरकारवर सामनाच्या रोखठोकमधून राऊत यांनी टीका केली

राऊत म्हणालेत की, केंद्र सरकारच्या क्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वर्ष म्हणून 2020 कडे पाहावे लागेल, असे देखील म्हटले आहे. राज्य व केंद्राचे संबंध बिघडत आहे. सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरणात आपले कर्तव्य विसरून गेले. देशाचे भवितव्य उज्ज्वल करणे किंवा अधोगतीला नेणे हे दोन चार माणसांच्या हाती जाणे ही भारतीय समाजजीवनाची शोकांतिका आहे. ही शोकांतिका सध्या सुरू आहे असं म्हणत राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे.

सामनाचे संपादक बोरूबहाद्दर -

सामनाचे संपादक बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आपल्या अकलेचे तारे आजच्या सामनामधून तोडलेले आहेत. देशामध्ये विभाजनवादी प्रवृत्ती वाढत आहे. रशियासारखी देशातील राज्ये फुटून निघतील असं देशद्रोही वक्तव्य यांनी आज आपल्या लेखातून केले आहे. त्यांना एवढेही भान नाही, राज्य फुटली ते रशियातून नाही, सोवियत युनियनमधून फुटली. देशाची फाळणी ज्या काँग्रेसने केली, ज्या तुकडे-तुकडे गॅंगला समर्थन काँग्रेसनं केलं. त्या कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचार सुचणारच. माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे की, देशातील फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन देणारे लिखाण सामनामधून केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मी करत आहे असे भाजप नेते व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.