मुंबई - प्रवाशांची वाढती गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
01112 या क्रमांकाची उत्सव विशेष ट्रेन 24 ते 31 ऑक्टोबरपर्यंत मडगावहून दररोज 4.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसर्या दिवशी 5.50 वाजता पोहचेल.
01111 उत्सव विशेष एक्सप्रेस 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 11.05 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 12.10 वाजता मडगावला पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिवि आणि करमाळी स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.
संरचनाः 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 7 शयनयान, 2 द्वितीय आसन श्रेणी.
01112 उत्सव विशेष या गाडीसाठीचे बुकिंग्स विशेष शुल्कासह आधीच चालू आहेत आणि 01111 उत्सव विशेष संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसिटीसी या वेबसाइटवर 24 ऑक्टोबरपासून सुरू होईल. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड- 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.