मुंबईः दोन दिवसापासून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी उगारलेल्या धडक कारवाईचे पडसाद मुंबईच्या पूर्व उपनगरात पहायला मिळाले. दोन दिवस कडक कारवाई करत गुन्हे दाखल केल्यानंतर आज पूर्व उपनगरातील रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
लॉकडाऊन वाढीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या आदेश खरच सकारात्मत बाबीकडे घेवून गेल्याच दिसले आहे. पूर्व उपनगरातील मुलुंड चेक नाका, भांडूप, जेवीएलआर, विक्रोळी , घाटकोपर, कामराज नगर आदी ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कारवाई केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनेही जप्त करण्यात आली. याचाच धसका घेत आज मुंबईकरांनी बाहेर न फिरता घरातच राहणं पसंत केल्याच दिसून येत आहे. तर अद्यापही मुंबईच्या अनेक भागात कठोर नाकाबंदी असताना मात्र काहीसा रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.