मुंबई - मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यावरून नवी दिल्लीत आंदोलन पेटले असताना आज मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अंबानी व अदानी विरोधात निघणार आहे.
हेही वाचा - पाँटिंग म्हणतो, ''कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश मिळू शकतो''
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले कायदे रद्द करावे व खाजगी कंपन्यांच्या ताब्यात शेती जाणे थांबवावी. तसेच स्वामीनाथन आयोग लागु करून उत्पादन खर्च धरून ५० टक्के नफ्यासह शेती पिकांचा हमी भाव जाहीर करावा, या प्रमुख मागण्या शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता मुंबईच्या बांद्रा येथील उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून हा मोर्चा निघणार असून तो बांद्रा - कुर्ला संकुलातील अंबानी यांच्या कार्पोरेट हाऊसवर धडकणार आहे. आता सगळ्या देशाचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.