ETV Bharat / city

'त्या' आंदोलक शेतकऱ्याची भाजपवर भिस्त.. आजी मुख्यमंत्र्यांकडून न्याय न मिळाल्याने माजी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट - Chief Minister

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आल्यानंतर धक्काबुक्की झालेले शेतकरी महेंद्र देशमुख, यांनी विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

farmer Mahendra Deshmukh met Devendra Fadnavis
शेतकरी महेंद्र देशमुख यांनी घेतली माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
author img

By

Published : Jan 22, 2020, 10:52 AM IST

Updated : Jan 22, 2020, 2:16 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्यानंतर धक्काबुक्की झालेल्या शेतकरी महेंद्र देशमुख याने माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांची भेट घेतली आहे. यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना देशमुख यांनी शेतकऱ्यांना न्याय फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात, असे म्हटले आहे.

आजी मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळाला नाही म्हणून शेतकरी महेंद्र देशमुख यांनी घेतली माझी मुख्यमंत्र्यांची भेट...

हेही वाचा... 'डॉ. आंबेडकरांचे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण ठरल्याशिवाय राहणार नाही'

महेंद्र देशमुख या शेतकऱ्यासोबत मातोश्री बाहेर धक्काबुक्की झाली होती. हा विषय चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाची दखल घेतली. कृषीमंत्री दादा भुसे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सांगण्यात आले. परंतु कृषीमंत्री व तहसीलदार, बँक अधिकारी यांच्याशी खूप दिवस चर्चा करूनही आपल्या समस्या न सुटल्याने शेवटी शेतकरी महेंद्र देशमुख यांनी आपल्या लहान मुलीसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीनंतर आपले समाधान झाल्याचे शेतकरी देशमुख यांनी सांगितले. तसेच आपल्याला न्याय फक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आमदार राम कदम यांनी देखील यावेळी बोलताना, 'अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना फक्त भाजपच न्याय देऊ शकतं. शेतकऱ्यांचा नेता देवेंद्र फडणवीस हेच आहेत' असे म्हटले आहे.

हेही वाचा... महाराष्ट्राच्या झेन सदावर्तेसह आकाश खिल्लारेला ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार'

शेतकरी महेंद्र देशमुख यांच्याबद्दल...

बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेने शेतकरी महेंद्र देशमुख यांची फसवणूक केली असल्याचा आरोप देशमुख या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या नावावर तीन वेळा ८ लाख असे 24 लाख बँकेने केले केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांना एकही रूपया मिळालेला नाही. आपल्या खात्यात बँकेचे पैसे आले नसूनही बँक कर्ज फेडण्यासाठी तगादा लावत असल्याचा देशमुख यांचा आरोप आहे.
महेंद्र देशमुख यांनी तीन मुलींच्या शिक्षणासाठी, तसेच स्वखर्चासाठी 23 फेब्रुवारी 2006 रोजी 8 लाख 40 हजार एवढी रक्कम फिक्स डिपॉझिट खात्यात जमा केली. बँक ऑफ इंडियाच्या आपटा शाखेत त्यांची ही रक्कम जमा होती.

2008 मध्ये बँकेने देशमुख यांना दूध डेअरीच्या व्यवसायासाठी 40 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. त्यावेळी त्या 40 लाखांसाठी देशमुख यांची 40 लाख रुपये किमतीएवढी मालमत्ता बँकेला तारण म्हणून हवी होती.
15 मार्च 2008 ला महेंद्र देशमुख यांनी 10 लाख 20 हजार रुपये रक्कम कुटुंबातील सर्वांच्या नावे जमा केली. त्यापूर्वी 2006 आणि 2007 या वर्षाची खात्यातील एकूण जमा रक्कम अंदाजे 23 ते 24 लाखांपर्यंत होती. त्यासाठी त्यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. त्या घराची रक्कम बँकेने जवळपास 8 लाख ठरवली. त्यानुसार अंदाजे 32 लाखापर्यंत रक्कम बँकेकडे तारण ठरवण्यात आली. मात्र तरीही 40 लाख तारण मालमत्ता दाखवण्यासाठी 8 लाख कमी पडत होते. त्यामुळे ते प्रकरण बँकेकडे सर्व कागदोपत्री स्थगित राहिले.

हेही वाचा.... अजित पवारांचे प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई न करण्याचे सिडकोला आदेश

या सर्व प्रकरणात तारण ठेवलेले जवळपास 32 लाख रुपये परत मिळू नयेत, यासाठी कर्ज काढण्याआधीच बँकेने तीन कर्ज लेखीपत्र देऊन लादल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. याबाबत पनवेल तहसील, पोलीस कार्यालयाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही, असे देशमुख यांनी सांगितले. याबाबत ते वांद्रे येथे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आले असता महेंद्र देशमुख यांनी अवैधरित्या तिथे जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत ताब्यात घेतले होते.

Intro:फ्लॅश

महेंद्र देशमुख ह्या शेतकऱ्यावर मातोश्री बाहेर मुख्यमंत्री यांचा भेटीदरम्यान अन्याय झाला होता .हा विषय चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेत, त्याला कृषीमंत्री दादाभुसे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सांगण्यात आलं होतं .परंतु कृषी मंत्री व तहसीलदार ,बँक अधिकारी यांच्याशी खूप दिवस चर्चा करूनही हा विषय मार्गी न लागल्याने शेवटी शेतकरी महेंद्र देशमुख आपल्या लहान मुलीसह आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते. या भेटीने त्यांचे समाधान झाल्याचे शेतकरी देशमुख यांनी व मला न्याय देखील विरोधी पक्षनेतेच देऊ शकतील सांगितले .यानंतर अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय फक्त भाजप देऊ शकतं असं आमदार राम कदम यांनी देशमुख यांच्या बोलण्यानंतर म्हटलेBody:।Conclusion:।कॅमेरा लाईव्ह वरून फीड पाठवले
Last Updated : Jan 22, 2020, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.