ETV Bharat / city

Fake Orders For Promotion IAS Officers : महसूल मंत्र्यांच्या सचिवासह आयएएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश

जिल्हाधिकारी संवर्गातील पाच सनदी अधिकाऱ्यांची (Fake Promotion IAS Officers) बढती आणि बदलीचे बनावट आदेश जारी झाल्याने मंत्रालयात एकच गोंधळ उडाला आहे. (Fake orders for promotion IAS officers) महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये (Revenue Minister Balasaheb Thorat) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी सचिव यांचा बनावट आदेश काढण्यात आला आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Jan 12, 2022, 1:00 PM IST

मुंबई - अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पाच सनदी अधिकाऱ्यांची बढती आणि बदलीचे बनावट आदेश जारी झाल्याने मंत्रालयात एकच गोंधळ उडाला आहे. (Fake orders for promotion IAS officers) महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये (Revenue Minister Balasaheb Thorat) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी सचिव यांचा बनावट आदेश काढण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित विभागाने (Revenue Minister Balasaheb Thorat) मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. यावर सोमवार रोजी मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

डॉ. माधव वीर यांच्या नावाने हा बनावट आदेश काढण्यात आला

या संबंधित अधिकाऱ्यांचे असा कोणताही अधिकृत आदेश संबंधित विभागाकडून जारीच करण्यात आला नव्हता. हे प्रकरण बोगस असल्याचे स्पष्ट होताच त्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत IAS समायोजित करुन पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना देण्याचा चक्क बनावट शासन आदेश काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अधिकाऱ्यांचे पदोन्नतीचे आदेश सहसचिव डॉ. माधव वीर यांच्या नावाने हा बनावट आदेश काढण्यात आला आहे. यात पाच अधिकार्‍यांना पदोन्नती देण्यात येत असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

बनावट आदेश प्रकरणी सहसचिव डॉ. माधव वीर यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी फसवणूक व बनावट स्वाक्षरीद्वारी बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बनावट आदेशानुसार महसूल मंत्र्यांचेच खासगी सचिव रामदास खेडकर यांना महसूल विभागाचे मुख्य सचिवपदी, गडचिरोलीचे अपर जिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संकेत चव्हाण यांची तेथेच अतिरिक्त आयुक्त (अ श्रेणी) पदी, अमरावतीच्या अपर जिल्हाधिकारी मनीषा वाजे यांची अमरावती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (अ श्रेणी) पदी, तर भंडाराचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांची तेथेच जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा- कालीचरण महाराज वर्धा पोलिसांच्या ताब्यात; दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.