ETV Bharat / city

Fake Casting Director Arrested : बंगाली अभिनेत्रीला फसवणाऱ्या बनावट डायरेक्टरला अटक; मुंबई सायबर पोलिसांची कारवाई - मुंबई सायबर पोलीस

एक बंगाली अभिनेत्री सोशल मिडियाच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात आली. त्यानंतर आरोपीने अभिनेत्रीला मुंबईत भेटण्यासाठी बोलावले आणि वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीला अर्धनग्न केले. ऑडिशनच्या नावाखाली तिचे फोटो घेतले. मात्र त्यानंतर त्याच्याकडून पैशाची मागणी होत होती.

बनावट डायरेक्टरला अटक
बनावट डायरेक्टरला अटक
author img

By

Published : Jan 11, 2022, 9:47 AM IST

Updated : Jan 11, 2022, 9:58 AM IST

मुंबई - हिंदी चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये काम देण्याचे आमिष देऊन एका बंगाली अभिनेत्रीची फसवणूक ( Deceive of Bengali Actress ) करणाऱ्या बनावट कास्टिंग डायरेक्टरला अटक ( Fake Casting Director Arrested ) करण्यात आली आहे. मुंबईच्या मालाड सायबर पोलिसांनी ( Cyber Police Mumbai ) ही कारवाई केली आहे.

बंगाली अभिनेत्रीला फसवणाऱ्या बनावट डायरेक्टरला अटक

अभिनेत्रीला पैशाची मागणी -

ओमप्रकाश तिवारी (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीतील ( Film Industry Mumbai ) एका मोठ्या बॅनरचा कास्टिंग डायरेक्टर म्हणून आपल्या फेसबुक प्रोफाइलमध्ये लिहून तसेच नवीन चित्रपट अभिनेत्रींना चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवायचा. आरोपीने याआधी चित्रपट निर्मितीमध्ये काम केले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एक बंगाली अभिनेत्री सोशल मिडियाच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात आली. त्यानंतर आरोपीने अभिनेत्रीला मुंबईत भेटण्यासाठी बोलावले आणि वेब सीरिज ( Web Series ) आणि चित्रपटांमध्ये काम देण्याच्या नावाखाली अभिनेत्रीला अर्धनग्न केले. ऑडिशनच्या नावाखाली तिचे फोटो घेतले. मात्र त्यानंतर त्याच्याकडून पैशाची मागणी होत होती. पैसे दिले नाही तर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची किंवा कास्टिंग काऊच ( Casting Couch ) करण्याची धमकी देत होता. नावाखाली तो तरुणीला कास्टिंग काउच करायला सांगायचा किंवा पैसे मागायचा.

पीडित अभिनेत्री ही कोलकाता येथील रहिवासी आहे. तिने काही बंगाली चित्रपटात काम केले आहे. कोरोना काळात काम नसल्याने हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी आरोपीच्या संपर्कात आली. मात्र आरोपीने पिडीतेचा फायदा घेत तिला ब्लॅकमेल करण्याचे काम केले. याप्रकरणी पीडितेने मालाड पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपीवर भादवी 345 (अ)(ब), 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 48 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Jan 11, 2022, 9:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.