ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी साधला उद्योजकांशी संवाद - उद्योजकांपुढील समस्यांवर संवाद

प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात येत असलेल्या अडचणी, या अडचणींवर सर्वांचे हित राखत सर्वांनी मिळून केलेली मात, आगामी काळात कराव्या लागणार्‍या उपाययोजना इत्यादींबाबत अभ्यासपूर्ण चर्चा झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे.

fadnavis discussion with various industry captains
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी साधला उद्योजकांशी संवाद
author img

By

Published : Apr 15, 2020, 7:22 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे यांचा अनेक उद्योगांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी आज विविध उद्योजकांशी कोरोना लॉकडाऊन काळातील अडचणी, नंतरच्या काळातील उपाययोजना यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

प्रत्येक क्षेत्रातील सद्यस्थितीबाबत त्यांनी सविस्तर मते जाणून घेतली. या संवादसेतूमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे डॉ. पवन गोयंका (ऑटोमोबाईल्स), फिनिक्स मार्केटसिटी अतुल रूईया (रिटेल आणि मॉल्स), रेमंड्स समूहाचे गौतम सिंघानिया (वस्त्रोद्योग), रहेजा समूहाचे रवी रहेजा (हॉस्पिटॅलिटी, आयटी, रिटेल), सिद्धार्थ रॉय कपूर (चित्रपट निर्मिती), रियाझ अमलानी (हॉस्पिटॅलिटी अँड रेस्टॉरंट), नमन समूहाचे जयेश शाह (हॉटेल्स आणि पायाभूत सुविधा), वेल्सस्पन बी. के. गोयंका (वस्त्रोद्योग आणि पायाभूत सुविधा), एल अँड टीचे अनुप सहाय (पायाभूत सुविधा, वीज, संरक्षण), फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी (फूड सर्व्हिसेस), बीव्हीजेचे हनुमंतराव गायकवाड (अन्नप्रक्रिया, सेवा) आदी सहभागी झाले होते.

प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात येत असलेल्या अडचणी, या अडचणींवर सर्वांचे हित राखत सर्वांनी मिळून केलेली मात, आगामी काळात कराव्या लागणार्‍या उपाययोजना इत्यादींबाबत अभ्यासपूर्ण चर्चा झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे.

या चर्चेत उद्योजकांनी आपल्या संकल्पना, सूचना, शिफारसी इत्यादी मनमोकळेपणाने मांडल्या आहेत. हे संवादसत्र अतिशय अभ्यासपूर्ण झाले आणि यातून आपल्यालाही अनेक नवीन बाबींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या संकटकाळात तर आपण एकत्र येऊन अनेक समस्यांवर मात करत आहोतच. अशीच मात आपण सारे मिळून येणार्‍या काळात सुद्धा करू. प्रत्येक क्षेत्राच्या फेरउभारणीसाठी सारे मिळून सामूहिक प्रयत्न करू असेही फडणवीस म्हणाले. तसेच अशाप्रकारचे आणखी काही संवाद येणार्‍या काळात साधणार असल्याचा मनोदय सुद्धा फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.