ETV Bharat / city

Rajendra Patil Yadravkar : कोरोना, आरोग्य यंत्रणा अन् बरंच काही; आरोग्य राज्यमंत्र्यांची विशेष मुलाखत - राजेंद्र पाटील यड्रावकर फेस टू फेस मुलाखत

महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती (State Corona) सध्या नियंत्रणात आहे. तसेच पुढील काळात प्रत्येत जिल्ह्यात मेडिकल कॉलेज (Medical Colleges) सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. डॉक्टरांची पदे सगळी भरायचे निर्देश दिलेले आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.

Rajendra Patil Yadravkar
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
author img

By

Published : Apr 2, 2022, 6:37 AM IST

Updated : Apr 2, 2022, 6:42 AM IST

मुंबई - कोरोना रुग्णांची (Corona Cases) संख्या आता झपाट्याने कमी होऊ लागलेली आहे. राज्यातील कोरोना जवळपास गेला आहे अशा पद्धतीचे चित्र दिसत आहे. तरीही चौथी लाट (Corona 4th Wave) येणार का हा एक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. राज्याची वाटचाल कशापद्धतीने सुरू आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांच्याकडून...

प्रश्न - महत्वाचा मुख्य प्रश्न म्हणजे कोरोनाची सद्यस्थिती काय आहे राज्यांमध्ये गेल्या दोन वर्षापासून जे थैमान घातलं होतं. अनेक लोकांचा जीव याच्यामध्ये गेला सध्या काय स्थिती आहे नियंत्रणात आला आहे का. समजा चौथी लाट येणार असेल, तर काय आपली तयारी असणार आहे?

राजेंद्र पाटील-यड्रावकर - कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्ये अधिक तरुणांचा समावेश होता. अनेक जीवाभावाचे लोक आपण दुसऱ्या लाटेमध्ये गमावली. तिसरी लाट अतिशय सौम्य स्वरूपाची होती. आजची परिस्थिती बघितली तर आपण साधारण शंभरच्या आसपास शंभरच्या थोडं जास्त अशा पद्धतीचा एकंदरीत राज्यात पॉझिटिव्हिटी रेट जर पाहिला तर आपण दररोज जे नमुने गोळा करतो तर शंभर पेशंट जवळपास आढळतात. येणाऱ्या काळामध्ये जर आपण जे निर्बंध शासनाने दिलेला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाची जबाबदारीची संकल्पना दिलेली आहे त्याचे जर पालन केले तर आपण बऱ्यापैकी अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली आहे. निश्चितपणे मास्क मुक्त असेल याबाबत निश्चित ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिनिधींनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घेतलेली मुलाखत

प्रश्न - टास्क फोर्ससोबत काही बैठक झाली आहे का मास्क मुक्तीच्या दृष्टीने काही ठोस निर्णय होतोय का?

राजेंद्र पाटील यड्रावकर - टास्क फोर्स सोबत बैठक झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा आता शंभरच्या आसपास आल्याने मुख्यमंत्री यानी त्याबाबत घोषणा केली आहे. .

प्रश्न - चौथी लाट जर संभाव्य असेल तर अशा पद्धतीची काही लाट दिसतय का आणि जर असेल तर आपली तयारी आता अधिक प्रमाणात झालेली आहे का?

राजेंद्र पाटील यड्रावकर - अजून राज्यांमध्ये इतर देशांमध्ये सुद्धा अजून इफेक्ट आपल्याला जाणवत नाही. चौथी लाट जरी आली तरी सुद्धा पहिली, दुसरी अथवा तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने जी आपण केलेली तयारी आहे. बेडची संख्या असेल ऑक्सीजन असेल किंवा वेंटीलेटर असतील सर्व बाबतीतली तयारी पूर्ण झालेली आहे. हे सगळ्याची आपली तयारी ही अतिशय आपल्याकडे कपॅसिटी आहे. आय सी यु बेड सह सर्व साधन सुविधांची जय्यत तयारी आहे त्यामुळे आपण निश्चितपणे मात करू शकतो.

प्रश्न - वैद्यकीय शिक्षण हे सुद्धा एक महत्त्वाचे खातं तुमच्याकडे आहे. या कायद्याअंतर्गत गेल्या दोन वर्षात आपण नवीन नवीन ठिकाणी काय यंत्रणा उभी करतोय. आरोग्य यंत्रणेत अद्ययावत कशी व्हावी, यासाठी काय प्रयत्न करतो आणि नवीन छोटे हॉस्पिटल छोट्या प्रमाणत बेड कुठे उभारतोय काय नेमकं करत आहोत?

राजेंद्र पाटील यड्रावकर - मेडिकल एज्युकेशन चा सुद्धा ह्या गेल्या दोन वर्षाचे महत्त्वाचे काम आहे. कोरोनाच्या कार्य काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मेडिकल कॉलेजचा सुद्धा आपल्याला उपयोग झालेला आहे. मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. पुढच्या काळामध्ये प्रत्येक जिल्हास्तरावर ही मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आणि एकंदरीत बघितलं का आता सातारा असेल परभणी असेल सिंधुदुर्गातील नवीन मेडिकल कॉलेजचे आपण आता प्रस्ताव दिलेले काम चालू आहे. जेणेकरून जिल्हा स्तरावर प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. एकंदरीत जी पहिली लाट असेल दुसरी लाट असेल तिसरी लाट असेल काळात आपल्याला डॉक्टरची जी कमतरता भासत होती ती भविष्यकाळात भासू नये कोणताही साथीचा जर काही आजार आला तर ती अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ असायला पाहिजे.

प्रश्न - मनुष्यबळ हा मुद्दा पण अतिशय महत्त्वाचा आहे. डॉक्टरांची किती पदे रिक्त आहेत हा महत्त्वाचा भाग दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर सहयोगी प्राध्यापक आहेत ज्यांनी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केलले आहे जेजेमध्ये, त्या प्रश्नासंदर्भात काय स्थिती आहे?

राजेंद्र पाटील यड्रावकर - डॉक्टरांची पदे सगळी भरायचे निर्देश दिलेले आहे पण जे बाकीचे क वर्ग आणि ड वर्ग भरती प्रक्रिया रखडलेली आहे परीक्षेमध्ये काही घोळ निर्माण झाला. त्यामुळे काही तिच्या खाण्याची पद्धत काही दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे ती सुद्धा भरून मिक्स किशन आरोग्य यंत्रणा आहे आजपर्यंत जी आरोग्य यंत्रणा व तीही गोरगरीब सर्वसामान्य म्हणजे ज्याला आर्थिक दृष्ट्या परवडत नाही त्यांची ही शासकीय जी आरोग्य व्यवस्था ही फक्त त्यांच्यासाठीच अशी होती अशी एकंदरीत सगळे धारणा आणि संकल्पना होती ह्या सगळ्या कोरोना च्या काळामध्ये एकंदरीत सिद्ध झाले की राज्याची शासकीय आरोग्य यंत्रणा ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये असेल किंवा मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय असतील ह्या सगळ्या च्या माध्यमातून आज सामान्य गोरगरीब माणसाच्या मोलमजुरी करणाऱ्या माणसाला सुद्धा उपचार करण्याची पहिल्या लाटेमध्ये सगळ्यात पुढे जाऊन ज्याने काम केलं तेही शासनाच्या आरोग्य खात्याने केले. ती मजबूत करणे आणि त्यासाठी म्हणून आता जवळपास आपण आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाच्या खाटा वाढवण्याच्या बाबतीत निर्णय घेतले जात आहेत. अशा ठिकाणी सुधारणा करणे आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम आता आपण चालू करतो आणि त्याला चांगल्या पद्धतीची तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार यांनी दिलेली आहे.

प्रश्न - एमपीएससी च्या माध्यमातून आता सगळ्याच खात्यांचे पदभरती सुरू आहे आपल्या खात्यामार्फत काय मागणी केली?

राजेंद्र पाटील यड्रावकर - एमपीएससीमार्फत आपण भरती करतो. आता सुद्धा भरती करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत.

प्रश्न - राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या आगीमध्ये अनेक निष्पाप जिवांचा जीव गेला होता तर अशा घटना पुन्हा घडू नयेत अशा सक्त सूचना वारंवार देतो पण त्यात तंतोतंत पाळल्या जातात असं नाही आता आपण या संदर्भामध्ये काय सक्त पावले उचलली आहेत का?

राजेंद्र पाटील यड्रावकर - आगी लागण्याचे प्रकार काही ठिकाणी घड़ले ते अत्यंत दुर्देवी होतो. आपण सूचना दिलेल्या आहेत की फायर ऑडिट करावे, इलेक्ट्रिक काही अडचणी असतील तर ही प्रत्येक आपल्या जिल्हा रुग्णालयासह, उपजिल्हा रुग्णालय असेल, मेडिकल कॉलेजचे रुग्णालय असेल आणि हे सगळे ऑडिट करून घ्यावी आणि या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी डीपीडीसी मधून तरतूद करून घ्यावी अशा सूचना दिलेल्या आहेत. फायर ऑडिट मध्ये जात त्रुटी समोर आले आहेत त्या पूर्ण करण्यासाठी डीपीसी मधून आपण तरतूद करावी अशा सूचना दिलेल्या आहेत.

प्रश्न - औषध प्रशासनासारखा महत्त्वाचं खातं आपल्याकडे आहे. जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अठराशे औषधांच्या किमती 11 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ते सगळे चाललेले त्यासोबत गैर प्रकारसुद्धा या औषधांच्या बाबतीत अनेकदा दिसून येते या सगळ्यावर आपल्या विभागामार्फत कशा पद्धतीने नियंत्रण ठेवता?

राजेंद्र पाटील यड्रावकर - औषध प्रशासन औषधाचे रेट वाढले जेनेरिक औषधांचा सगळीकडे ही औषधे चालू झाले पाहिजे. जेणेकरून सामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीची यंत्रणा उभी करण्यासाठी म्हणून आपण प्राधान्य आपण देतोय. त्याच बरोबर या औषधांचे दर ड्रग कंट्रोल अथॉरिटी ठरवत असते, त्यामुळे आपण जेनेरिक औषधांच्या माध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असतो. सामान्य माणसाला ही सगळी औषधे परवडली पाहिजे या दृष्टीने आपले निश्चितपणे प्रयत्न चालू आहेत, काही ठिकाणी अडचण येते त्या ठिकाणी सुद्धा आपण सक्त सूचना आपण दिलेले आहेत. जिथे अशा पद्धतीने दिसते तिथे ड्राईव्ह घेण्याच्या बाबतीत सुद्धा सूचना अन्न आणि औषध प्रशासन विभागाला दिल्या आहेत

प्रश्न - तेल, दूध, मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थ यांच्यात मोठ्या प्रमाणात भेसळ आळते आणि सातत्याने अशा पद्धतीचे करताना भरारी पथकांच्या माध्यमातून काम करताना आतापर्यंत किती केसेस केलेले किंवा काय दंड वसूल केले किंवा काय कारवाई केली?

राजेंद्र पाटील यड्रावकर - तेल, गुटखा सेवन बाकीच्या गोष्टी आहेत यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होते. जिथे आपल्याला तक्रारी आढळतात तिथे कारवाई केली जाते. एकंदरीत औषध प्रशासनाचा संख्या बघितली आणि टोटल लायसन्स संख्या बघितली तर हे सगळं हे प्रमाण फार मोठ आहे. त्यामुळे जवळपास ४७६ ठिकाणी आपण धाडी टाकून जवळपास ५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

प्रश्न - अत्यंत महत्त्वाचं आपल्या राज्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. सांस्कृतिक विभागामार्फत आपण काही उत्सव किंवा काही अशा राबवण्याचा विचार आगामी काळात करत आहोत का. आणि या खात्यामार्फत जी आपले कलावंत आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत ज्यांना काही त्याच्या मध्ये वाढ करायची प्रश्नही त्यांना मिळत नाही याच्यावर काही आपण करतो?

राजेंद्र पाटील यड्रावकर - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सांस्कृतीक छोटी-मोठे ग्रामीण भागातली कलाकार असतील शहरी भागातले कलाकार असतील त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागला. सगळेच कार्यक्रम ही बंद झाल्यामुळे त्या लोकांचे अनेक उपासमारीची काही लोकांच्यावर वेळ आली त्यासाठी म्हणून सुद्धा शासनाने त्याला मदत द्यायची भूमिकाही शासनाने केली. त्याच प्रमाणे आता ही लावणी महोत्सव असेल अशा बाकीच्या या स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपण वेगवेगळे उत्सव प्रतिवर्षी सांस्कृतीक खात्यामार्फत राबवले जातात. पण गेल्या दोन वर्षांमध्ये या काळामध्ये ते सगळे थांबले होते. सध्य़ा आपण थिएटरला शंभर टक्के परमिशन देतो सगळे चालू होऊन नवीन कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचे काम सांस्कृतिक खात्यामार्फत निश्चितपणे केले जाईल. आज त्यांच्या पेन्शनच्या बाबतीत बोलायचे झाले तर अनेक ठिकाणी अजून जिल्हा स्तरावर आपली जी कमिटी असते तर काही ठिकाणी अजून निर्माण होणे बाकी आहे काही लोकांचे प्रस्ताव आलेले आहेत पण कमीटी नसल्यामुळे ते प्रस्ताव आलेले नाही त्यामुळे आपण प्रत्येक जिल्हास्तरावर आपण सूचना देतो की लवकरात लवकर जिल्हास्तरावरची कमिटी करून खरोखर कलाकार या सगळ्या अनुदानापासून मिळण्यासाठी म्हणून त्याला लवकरात लवकर करून प्रस्ताव पाठवण्याचा बाबतीत सूचना देऊ

Last Updated : Apr 2, 2022, 6:42 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.