ETV Bharat / city

लोकलमध्ये प्रवासासाठी वकिलांना दिलेल्या मुभेचा कालावधी वाढवला - लोकल रेल्वे बातमी

2 ऑक्टोबर रोजी कोविडमुळे आवश्यक सेवा देणाऱया कर्मचार्‍यांसाठीच चालवल्या जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना परवानगी दिली होती.

local
लोकल
author img

By

Published : Dec 3, 2020, 7:18 PM IST

मुंबई - रेल्वे अधिकार्‍यांनी मुंबईच्या विशेष उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याच्या परवानगीची मुदत न्यायालयात काम करणार्‍या वकिलांना दिलेली 'पुढील सल्लामसलत' पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी कोविडमुळे आवश्यक सेवा देणाऱया कर्मचार्‍यांसाठीच चालवल्या जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना परवानगी दिली होती.

गुरुवारी संयुक्त संवाद साधून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने परवानगी कालावधी वाढवण्याची घोषणा केली. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या 5 हजार 600 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 18,32,177 झाली.

15 डिसेंबरपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता

सरकारकडून लवकरच सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होईल? असा प्रश्न प्रत्येकाचा होता. पण आता मुंबईकरांना 15 डिसेंबरपासून लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार यावर विचार करत असल्याचे संकेत महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येकाला लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी नव्हती.

हेही वाचा - कंगनासोबत वैयक्तिक वाद नाही, पण उत्तर देणे गरजेचे होते - उर्मिला मातोंडकर

हेही वाचा - शेतकरी व कामगारांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा ८ डिसेंबरला चक्का जाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.