ETV Bharat / city

मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणी कॉर्डेलिया क्रूझ कंपनीच्या सीईओंनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले...

ज्या क्रूझवर पार्टी चालली होती. ती कंपनी कॉर्डेलिया कंपनीची होती. दरम्यान, यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जर्गेन बैलोम यांनी एक निवेदन जारी केले आहे.

NCB probe into Aryan Khan's drugs party
शाहरुख खानच्या मुलाची चौकशी
author img

By

Published : Oct 3, 2021, 1:24 PM IST

Updated : Oct 3, 2021, 2:38 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकत येथून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. ज्या क्रूझवर पार्टी चालली होती. ती कंपनी कॉर्डेलिया कंपनीची होती. दरम्यान, यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जर्गेन बैलोम यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी 'एनसीबीला काही प्रवाशांच्या सामानामध्ये ड्रग्ज सापडली आहे. जी ताबडतोब उतरवण्यात आली. यामुळे क्रूझला प्रवास सुरु करण्यासाठीही विलंब झाला, असा खुलासा केला आहे. तसेच या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही, असेही कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

अरबी समुद्रातील क्रुझ शिपवरील ड्रग्स पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन खानसह एकूण आठ जणांची चौकशी एनसीबीकडून केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आठ जण ताब्यात - एनसीबी प्रमुख एसएन प्रधान

या प्रकरणी आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एनसीबीचे प्रमुख एस एन प्रधान यांनी एएनआयशी बोलातना दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील छापे टाकले जातील असे ते म्हणाले. आम्ही इनपुट गोळा करत होतो आणि जेव्हा चरस आणि एमडीएमसारखी औषधे वापरल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही कारवाई केली. आम्ही निष्पक्षपणे वागत आहोत. प्रक्रियेत, जर बॉलिवूड किंवा श्रीमंत लोकांशी काही संबंध उदयास आले, तर ते असू द्या. आम्हाला कायद्याच्या कक्षेत काम करावे लागेल असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याचे समजते आहे. दरम्यान, एनसीबीने पार्टीच्या आयोजकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी प्रवासी बनून शिपमध्ये प्रवास केला आणि ही कारवाई केली होती.

हेही वाचा - ड्रग्स पार्टीत शाहरूखचा मुलगा आर्यन खानचाही सहभाग; एनसीबीकडून चौकशी

Last Updated : Oct 3, 2021, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.