मुंबई - दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील स्वर्गीय माजी खासदार मोहन डेलकर ( Mohan Delkar suicide case ) यांनी मागील वर्षी आत्महत्येपूर्वी १४ पानी चिठ्ठी घेऊन मुंबईतील मरीन लाईन येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला होता. या चिठ्ठीत आठ लोकांचे नाव लिहिले होते. या आठही लोकांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौकशी करण्याकरिता समन्स बजावला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र सर्व आठही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर मंगळवारी सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.
मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. यामुळे चिठ्ठीत नावे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहेत. मुंबई पोलिसांनी माजी पोलिस अधीक्षक, जिल्हा दंडाधिकारी आणि दादरा आणि नगर हवेलीचे उपजिल्हा दंडाधिकारी यांच्यासह आठ जणांना समन्स बजावले आहेत.
हेही वाचा - मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी प्रशासकांची चौकशी; काय म्हणतो कायदा?
डेलकर कुटुंबियांनी नोंदवला जवाब
9 मार्च 2021 रोजी, मुंबई पोलिसांनी डेलकरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर नोंदवला. डेलकर यांचा मुलगा अभिनव याने आयपीसीच्या कलम 306 आत्महत्येला प्रवृत्त करणे, 506 गुन्हेगारी धमकी आणि 120 बी गुन्हेगारी कट तसेच एससी/एसटी प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यां अंतर्गत तक्रार नोंदवली होता. एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला होता की डेलकर गेल्या एक वर्षापासून दबावाखाली होते आणि डीएनएच प्रशासन त्यांचा सतत छळ करत होते आणि फायदा मिळवण्यासाठी त्यांच्याशी अनादर करत होते. एमपीच्या कॉलेजवर एसएसआर कॉलेज ऑफ फार्मसी अँड मॅनेजमेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना पुढील निवडणुका लढवण्यापासून रोखण्यासाठी कटकारस्थान करण्यात येत होते असे आरोप डेलकर यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.
पटेल यांच्याविरोधात तक्रार
प्रफुल्ल खोडा पटेल, केंद्रशासित प्रदेश प्रशासक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप सिंग, शरद दराडे, तत्कालीन पोलीस अधीक्षक अपूर्वा शर्मा, तत्कालीन उपजिल्हाधिकारी मनस्वी जैन, उपविभागीय अधिकारी मनोज पटेल, पोलिस निरीक्षक (सिल्वासा) रोहित यादव, राजकीय नेते फत्तेसिंग चौहान आणि दिलीप पटेल सिल्वासाचे तलाठी यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा - मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल