ETV Bharat / city

'रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना देण्यासाठी ‘विशेष हेल्पलाईन’ सुरू करा'

रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आल्याने रुग्णालय प्रशासनाकडून कुठलीच माहिती नातेवाईकांना देण्यात येत नाही. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना देण्यासाठी ‘विशेष हेल्पलाईन’ सुरू करण्याची मागणी आमदार तथा माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी केली.

author img

By

Published : May 18, 2020, 1:05 PM IST

Hospital
संग्रहित छायाचित्र

मुंबई - रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रकृतीची माहिती नातेवाईकांना देण्यासाठी ‘विशेष हेल्पलाईन’ सुरू करण्याची मागणी आमदार तथा माजी राज्यमंत्री रवींंद्र वायकर यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले असून या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या दैनंदिन उपचाराची माहितीही कुटुंबीयांना देण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारसह महापालिका, लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस प्रशासन दिवसरात्र मेहनत करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कोरोना झालेले अनेक रुग्ण यावर मात करुन आपल्या घरी देखील पोहोचले आहेत.

अनेक रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये राज्य सरकारद्वारे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना तसेच नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीची माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आल्याने रुग्णालय प्रशासनाकडून कुठलीच माहिती नातेवाईकांना देण्यात येत नाही. अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या बाहेर चिंतेने तासनतास बसलेले असतात. त्यातच रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्यांच्याकडून नातेवाईंना माहिती देणे शक्य होत नाही. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रुग्णालयात उपचार घेणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा तसेच धीर देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ज्या ज्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्या सर्व रुग्णालयांमध्ये तात्काळ स्वतंत्र ‘विशेष हेल्पलाईन’ सुरू करावी. या हेल्पलाईनवर रुग्णालयात उपचार घेणार्‍या फक्त कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीची माहिती त्यांच्या कुटुंबियांना तसेच नातेवाईकांना मिळण्यास मदत होईल. यामुळे रुग्णालयाच्या आवारात अथवा परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी गर्दी टाळण्यासही मदत होईल. तरी अशा प्रकारची हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी आमदार तथा माजी राज्यमंत्री वायकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.