ETV Bharat / city

Omicron Variant पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक...वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

etv bharat maharashtra
etv bharat maharashtra
author img

By

Published : Nov 29, 2021, 6:19 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • कोरोनाच्या नव्या स्टेन बाबत राज्य मंत्रिमंडळाची दुपारी एक वाजता महत्वपूर्ण बैठक

ओमिक्रॉंन या नव्या वेरियंटच्या पार्श्वभूमिवर आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी एक वाजता महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. काल सरकारने कोरोनासंदर्भात काही नियमावलीही जाहीर केली आहे.

  • प्रहार संघटनेच्यावतीने इस्लामपूर येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन

प्रहार संघटनेच्यावतीने इस्लामपूर येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन राज्यमंत्री बच्चू कडू यांचा हस्ते दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.

  • परमवीर सिंग यांची मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज आज सुनावणी

फरार घोषित केलेला अर्ज रद्द करण्यात यावा परमवीर सिंग यांची मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज आज सुनावणी होणार आहे.

  • अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार असून त्यांना पुन्हा त्यांना विशेष न्यायालयात हजर करणार आहे. अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होणार की, त्यांना दिलासा मिळतो. याकडे सर्वांचे लक्ष असेल.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

  • मुंबई - कोरोना ( Corona ) या विषाणूची तीव्रता कमी होत असताना आता दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या "ओमिक्रोन" ( Omicron Variant ) हा नवीन विषाणू सध्या जगभर चर्चेचा विषय झालेला आहे. या विषाणूची तीव्रता पाहता राज्यांमध्येही नियमांचे कडेकोट पालन करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी दिल्या आहेत. आज (दि. 28) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सचिव, कोविड टास्क फोर्स यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. सविस्तर वाचा...
  • ठाणे - दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली येथे आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्याला सध्या कल्याण पश्चिम भागातील लाल चौकी परिसरात असलेल्या आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयातील विलागिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हा रुग्ण आल्यापासून कोणाच्याही संपर्कात आलेला नाही, अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रतिभा पान पाटील यांनी दिली. सविस्तर वाचा...
  • नाशिक - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारचा नावलौकिक, पारदर्शी सरकार, विकासाचे सरकार,प्रादेशिक समतोल ठेवून पुर्ण महराष्ट्राचा विकास करणारे सरकार म्हणून नाव लौकिक मिळविला होता. उध्दव ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले असून या दोन वर्षात गुन्हेगारी वाढली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, प्रादेशिक असमतोल वाढला,या सरकारच्या निम्या मंत्रीमंडळावर गुन्हे दाखल झाले. राजकारणाचे गुन्हेगारी करण वाढले असून देशात क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. सविस्तर वाचा...
  • नाशिक - कोरोनाचा ओमिक्राॅन हा नवा व्हेरियंट ( Omicron New Variant ) आला असून ज्या देशात सापडला तेथील प्रवाशांवर देशात येण्यास बंदी घालावी अथवा त्यांना क्वारंटाईन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी दिली आहे. ते कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातील १८३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.