ETV Bharat / city

वांद्र्यातील शेल्टर होमने दिलाय रुग्णांसह इतरांनाही आधार; ईटीव्ही भारतचा ग्राऊंड रिपोर्ट - lockdown

संघाच्या शाळेच्या हॉल आणि परिसरात या शेल्टर होममध्ये झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल या राज्यासह आपल्या राज्यातील असे एकूण १३५ महिला, पुरुषांना आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे यात अनेक जण हे टाटा कँसर रुग्णालयात उपचारासाठी आले होते, परंतु लॉकडाऊनने त्यांच्यापुढे संकट उभे केले आहे.

shelter home
वांद्र्यातील शेल्टर होमने दिलाय रुग्णांसह इतरांनाही आधार
author img

By

Published : Apr 17, 2020, 9:51 AM IST

मुंबई - कोरोना आणि त्यानंतर सुरू असलेल्या लॉकडाऊनने लाखो लोकांना रस्त्यावरच जगण्यास भाग पाडले आहे. अशावेळी वांद्रे पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या शेल्टर होमने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त फरपट होत असलेल्या आणि बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातून आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना या शेल्टर होमने आधार दिला आहे. उत्तर भारतीय सेवा संघ या संस्थेच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी शेल्टर होम सुरू करण्यात आले आहे.

वांद्र्यातील शेल्टर होमने दिलाय रुग्णांसह इतरांनाही आधार

संघाच्या शाळेच्या हॉल आणि परिसरात या शेल्टर होममध्ये झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल या राज्यासह आपल्या राज्यातील असे एकूण १३५ महिला, पुरुषांना आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे यात अनेक जण हे टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी आले होते, परंतु लॉकडाऊनने त्यांच्यापुढे संकट उभे केले आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून आलेल्या आणि रक्ताचा कॅन्सर असलेल्या प्रमिला देवी यांच्यावर उपचार झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी देणार इतक्यात देशभरात लॉकडाऊनची सुरुवात झाली. पत्नीला रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर आम्ही रस्त्यावरच राहिलो असल्याचे त्यांचे पती आनंदी पासवान यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आम्ही इकडे आलो असून इथे आम्ही सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील सिकलोही गावातील कुसमा यांचीही अशीच व्यथा आहे. पोटाचे एक ऑपरेशन टाटा रुग्णालयात झाले आणि गावी जाण्यासाठी सुट्टी मिळणार होती, पण, लॉकडाऊनने संकट उभे राहिले. आम्हाला गावी जायचं आहे, पण सगळे बंद असल्याने आम्ही संकटात सापडलो असल्याचे त्यांचे पती राम भवन यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातून आपल्या पायाच्या उपचारासाठी केईम रुग्णालयात आलेल्या प्रशांत पाटील यांना तर उपचारही मिळाले नाहीत. ज्या दिवशी त्यांना डॉक्टर तपासणार होते, त्याच दिवशी लॉकडाऊनने ओपीडी बंद झाली. गावी जाता येत नव्हते, आणि दुसरा पर्याय नव्हता म्हणून आपण अनेक दिवस फुटपाथवर काढले. आता येथे उत्तर भारतीय संघाच्या शेल्टर होमने आपल्याला आधार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे येथील शेल्टर होमची व्यवस्था उत्तर भारतीय सेवा संघाकडून केली जात आहे. 2 एप्रिलला हे शेल्टर होम सुरू करण्यात आले असून आज येथे 135 जण आहेत. त्यांना आम्ही जेवण, नाष्टा आदी सर्व सोय करत असल्याची माहिती येथील व्यवस्थापक सचिन हेडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.