मुंबई - थोडक्यात पण महत्त्वाचे.. पाहा राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा
अकोल्यात 18 जण पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचा मृत्यू, 32 जणांची कोरोनावर मात
- अकोला - कोरोना तपासणी अहवालात रविवारी जिल्ह्यात 13 जण पॉझिटिव्ह तर रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये पाच जण असे एकूण 18 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 32 जणांनी कोरोनावर मात केली.
कोल्हापूरात आणखी 462 नवे रुग्ण, 12 जणांचा मृत्यू
- कोल्हापूर - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोल्हापूरात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी सुद्धा जिल्ह्यात 462 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1687 प्राप्त अहवालापैकी 455 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. शिवाय अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 39 प्राप्त अहवालामध्ये 7 पॉझिटिव्ह असे एकूण 462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात रविवारअखेर एकूण 6 हजार 905 रुग्णांपैकी 3 हजार 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 3,639 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
वसई विरारमध्ये 204 नवे कोरोनाबाधित, एकूण संख्या 12 हजार 350 वर
- पालघर/ वसई - संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. रविवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 204 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. रविवारी दिवसभरात उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला तर 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पंढरपूर तालुक्यात 56 जणांची कोरोनावर मात
- सोलापूर - पंढरपूर तालुक्यात एमआयटी कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे 270 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून, रविवारी 56 जणांना कोरोामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. शहर आणि तालुक्यात 19 जणांना कोरोनाची लागण झाली. पंढरपुरमध्ये बरे होण्याची संख्या 272 वर गेली आहे.
माळशिरस तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह 242
- सोलापूर - माळशिरस शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. शहरातील लोकवस्ती भागात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 147 झाली आहे. दरम्यान, बरे होणाऱ्याची संख्या 97 आहे तर कोरोनाची एकूण संख्या 242 इतकी झाली आहे.
सांगलीत कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात 294 रुग्णांची भर
- सांगली - जिल्ह्यात रविवारी कोरोनाचा कहर कायम आहे. रविवारी दिवसभरात सहा कोरोना रुग्णांचा उपचारादरम्याण मृत्यू झाला. तर तब्बल 294 कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 268 जणांचा समावेश. उपचार घेणारे 90 जण रविवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्ण संख्या 1 हजार 641 आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही हिंगोलीत 46 कोरोनाबाधित रुग्ण, 56 रुग्ण कोरोनामुक्त
- हिंगोली - जिल्ह्यातील रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली दिसत आहे. रविवारी हिंगोली जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालामध्ये पुन्हा 46 कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, एकाचवेळी 56 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने काहीसा दिलासा देखील मिळाला आहे.
सोलापुरात रविवारी 185 नवे कोरोना रुगण, 224 जणांना डिस्चार्ज
- सोलापूर - रविवारी सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सोलापुरातील एकूण कोरोणा रुग्णसंख्या आता 9 हजाराच्या वर गेली आहे. रविवारी शहर आणि जिल्ह्यात 1 हजार 875 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 185 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकूण 224 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मीरा भाईंदरमध्ये कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू
- मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर शहरात रविवारी 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 110 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनावर उपचार घेत असताना 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.