ETV Bharat / city

Breaking: मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला ईडीचे समन्स

Etv bharat Breaking
Etv bharat Breaking
author img

By

Published : Nov 4, 2021, 6:30 AM IST

Updated : Nov 4, 2021, 10:47 PM IST

22:47 November 04

पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचे निधन

पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात निधन झाले.

22:21 November 04

मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला ईडीचे उद्या चौकशीसाठी समन्स

मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला ईडीने उद्या चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

18:34 November 04

अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरू

मुंबई फ्लॅश-

मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरू

अभिनेत्री भाग्यश्रीने केली सुरूवात.

आशिष कुमार चौहान, संचालक आणि सीईओ शेअरमार्केट उपस्थित

गुजराती आणि मारवाडी यांच्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस

पुढचे वर्ष असेच चांगले जावे अशी इच्छा

जेव्हापासून बीएसइची स्थापना झाली तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला

मागचे वर्ष चांगले गेले गे हे वर्ष देखील चांगले जाईल अशी अपेक्षा

भाग्यश्री - आता ट्रेडिंग सुरू झाले आहे. पैसे गुंतवा आणि पैसे कमवा हेच मी या निमित्ताने सांगेन.

ही खूप चांगली सुरुवात झाली आहे.

योग्य जागेवर पैसा गुंतवला पाहिजे असे माझे मत आहे

17:59 November 04

एनसीबीकडून ७०० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले

मुंबई - एनसीबीकडून ७०० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपी कृष्णा मुरारी प्रसादला एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

11:43 November 04

पंतप्रधान नरेंद्र मोदी नौशेरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी याहीवर्षी सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यासाठी मोदी हे जम्मू काश्मीरमधील नौशेरा येथे पोहोचले आहेत.

11:38 November 04

वणीत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंदु किसन मडावी असे मृत चालकाचे नाव आहे. ते एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या उपोषण आणि आंदोलनात सहभागी होते. उपोषण सुरू झाल्यापासून घरी सुद्धा जेवण करत नव्हते. काल रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

09:15 November 04

दोन अल्पवयीन मुलींचे एजंटामार्फत लावले बालविवाह, औरंगाबादेत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद - वैजापुरात आईवडिलांनी दीड लाख रुपये घेऊन दोन अल्पवयीन मुलींचे एजंटामार्फत लावले बालविवाह. या प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

08:12 November 04

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेते राहुल गांधींकडून दिवाळीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात यश, संपन्नता आणि सुख घेऊन येवो, अशी प्रार्थना केली. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील 'सर्वांचे मन जोडणारी दिवाळी साजरी करूया' असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहे.

06:49 November 04

सुपरस्टार अभिनेता रजनीकांत याचा आज 'अण्णाथ्थे' चित्रपट प्रसिद्ध

मुंबई - सुपरस्टार अभिनेता रजनीकांत याचा आज 'अण्णाथ्थे' चित्रपट प्रसिद्ध होतोय. रजनीकांतच्या चाहत्यांनी सकाळपासून सिनेमागृहात गर्दी करणे सुरू केले आहे. तसेच दिवाळी असो किंवा नसो, रजनीकांतचा चित्रपट आमच्यासाठी दिवाळीच असल्याची भावना एका चाहत्याने व्यक्त केली आहे.

06:13 November 04

आज नरक चतुर्दशीची लगबग

पुण्यात नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन निमीत्त महालक्ष्मी मंदिरात देवीला अभिषेक आणि लक्ष्मीपूजन करण्यात आले.

उधमपूर (जम्मू काश्मीर) - दिवाळीच्या पूर्वसंध्येला 'एक दिया शहीदों के नाम' स्मरण कार्यक्रमात लोकांनी शहीदांच्या स्मरणार्थ दिवे पेटवले.

Last Updated : Nov 4, 2021, 10:47 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.