ETV Bharat / city

'टॉप सिक्युरिटी'मधील अधिकाऱ्याला ईडीकडून अटक; प्रताप सरनाईकांचे आहेत निकटवर्तीय

'टॉप सिक्युरिटी' एजन्सीमध्ये महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या अमित चंदोले यांना १७५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले अमित चंदोले हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Enforcement Directorate has arrested one Amit Chandole in an alleged money laundering case related to private company Tops Security
'टॉप सिक्युरिटी'च्या मालकाला ईडीकडून अटक; प्रताप सरनाईकांचे आहेत निकटवर्तीय
author img

By

Published : Nov 26, 2020, 8:39 AM IST

Updated : Nov 26, 2020, 10:40 AM IST

मुंबई - 'टॉप सिक्युरिटी' एजन्सीमध्ये महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या अमित चंदोले यांना १७५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले अमित चंदोले हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या संचालकपदीही अमित चंदोले आहेत.

१२ तासांच्या चौकशी नंतर अटक

याप्रकरणी गुरुवारी अमित यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने त्यांना अटक केली. टॉप सिक्युरिटी कंपनीकडून एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम केले जात होते.

प्रताप सरनाईकांचे बालपणीचे मित्र..

अमित चंदोले हे प्रताप सरनाईकांचे बालपणीचे मित्र आहेत. या दोघांनी मिळून काही व्यवसाय सुरू केले होते. तसेच प्रताप सरनाईकांच्या कित्येक व्यवसायांमध्ये चंदोले हे भागीदार आहेत. टॉप सिक्युरिटी आणि विहंग ग्रुप या कंपन्यांमधील दुवा म्हणजेच अमित चंदोले असं बोललं जातं.

अमित चंदोलेंमुळेच सरनाईक अडचणीत..?

एमएमआरडीएच्या तक्रारीवरुन ईडीने कारवाईसाठी अमित चंदोलेंना २४ नोव्हेंबरलाच ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रताप सरनाईकांशी त्यांचे असलेले संबंध पाहता सरनाईकांचीही चौकशी ईडीने सुरू केली. त्यामुळे चंदोलेंमुळेच सरनाईक अडचणीत आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

एमएमआरडीएने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीनुसार, टाॅप्स सिक्युरिटीचे मुख्य भागीदार अमित चंदोले यांनी एमएमआरडीए करता सुरक्षा रक्षक पुरवण्याचे मोठे कंत्राट घेतले होते. त्या कंत्राटाकरता अमित चंदोले आणि कंपनीने १७५ कोटी रुपये घेतले होते. मात्र कोणतीही सुविधा न देता है पैसे अमित चंदोले यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रताप सरनाईकांनाही समन्स..

मंगळवारी दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकाने मुंबई आणि ठाणे परिसरात दहा ठिकाणी छापेमारी केली होती. विहंग ग्रुप ऑफ कंपनीज आणि टॉप ग्रुपच्या कार्यालयांवर, तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांचीही ईडीने पाच तास चौकशी केली होती. तसेच, प्रताप सरनाईकांनाही ईडीने समन्स बजावण्यात आले आहे.

हेही वाचा : प्रताप सरनाईक ईडी छापा प्रकरण : ईटीव्हीने घेतलेला आढावा...

Last Updated : Nov 26, 2020, 10:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.