ETV Bharat / city

'संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच' - भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक

महापारेषणच्या संचालक पदावर मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भरती प्रक्रियेत हस्तक्षेप सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया तातडीने रोखावी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक
भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक
author img

By

Published : May 21, 2021, 9:38 PM IST

मुंबई - महापारेषणच्या संचालक पदावर मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भरती प्रक्रियेत हस्तक्षेप सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया तातडीने रोखावी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केली आहे. या प्रकरणासंदर्भात विश्वास पाठक यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहिले आहे.

'संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच'

'मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठीच घाट घातला असावा'

विश्वास पाठक यांनी सांगितले की, महापारेषणच्या संचालकपदाच्या नियुक्तीसाठी राज्य वीज मंडळाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत संचालकपदासाठीच्या पात्रता आणि अटी पाहिल्यावर ऊर्जामंत्री राऊत यांनी या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठीच हा घाट घातला असावा, असा संशय बळावतो आहे. या पदासाठीच्या नियुक्तीकरीता पूर्वी ज्या अटी व शर्ती होत्या. त्यात बदल करण्यात आला आहे. उमेदवाराने दोन टर्म्सपेक्षा अधिक वर्षे संचालक म्हणून काम केलेले नसावे, 20 वर्षे कार्यकारी अभियंता म्हणून काम केलेले असावे व किमान एक वर्ष कार्यकारी संचालक म्हणून काम केलेले असावे, अशा अटी या जाहिरातीत घालण्यात आल्या आहेत. एक महिन्यापूर्वीच महाजेनकोच्या संचालकपदी निवृत्त झालेल्या थोटवे यांना चौथ्यांदा नियुक्त केले गेले. मात्र महापारेषणचा संचालक नेमताना 2 टर्म्सपेक्षा अधिक काळ काम केलेले नसावे, अशी अट घातली गेली असल्याने या प्रक्रियेविषयी संशय अधिकच वाढलेला आहे.

'महापारेषणमध्ये पात्रता असलेला एकही अधिकारी नाही'

सध्याच्या स्थितीत महापारेषणमध्ये पात्रता असलेला एकही अधिकारी नाही. हे पाहूनच अशा अटी घातल्या गेल्या असाव्यात, महापारेषणच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय ताकसांडे यांच्याकडे आहे. ताकसांडे यांची या पदावरील प्रतिनियुक्ती पुढे चालू राहावी या उद्देशानेच किंवा बाहेरील अन्य उमेदवाराबरोबरची बोलणी यशस्वी झाली असल्याने भरती प्रक्रियेचा हा फार्स सुरू आहे. संजय ताकसांडे हे महावितरण संचालक (ऑपरेशन्स) म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्यावर कामाचा मोठा भार असताना महापारेषणच्या संचालकपदाच्या जबाबदारीचा आणखी भार कशासाठी याचे उत्तर ऊर्जामंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी विश्वास पाठक यांनी केली आहे.

'मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रिया त्वरीत थांबवावी'

महापारेषणचे संचालक (प्रकल्प) हे पदही रिक्त आहे. मात्र त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या पदासाठी योग्य उमेदवार मिळण्यासाठी बोलणी यशस्वी न झाल्यानेच या पदासाठीची नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नसावी, असा आरोपही यावेळेस भाजपा प्रवक्ते विश्वास पाठक यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर केला आहे. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी भरती प्रक्रियेत सुरू केलेला हस्तक्षेप पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रक्रिया त्वरीत थांबवावी, अशी मागणी विश्वास पाठक यांनी केली आहे.

हेही वाचा - बार्ज पी-305 दुर्घटना : नौदलाने वाचवले अनेकांचे प्राण; 60 जणांचा मृत्यू, बचावकार्य अद्यापही सुरुच

हेही वाचा - बार्ज पी-305 : नातेवाईकांच्या नाराजीनंतर ४४ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण, २३ जणांची ओळख पटली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.