मुंबई - येत्या २१ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द क्लास ऑफ 83' हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस खात्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडून या चित्रपटाच्या ओटीटी फ्लॅट फार्म असलेले नेटफ्लिक्स , रेडचीली प्रोडक्शन हाऊस व लेखक हुसेन जैदी यांना नोटीस पाठवली आहे.
या नोटीसहीद्वारे प्रदिप शर्मा यांनी म्हटले आहे की, 2018 साली प्रदीप शर्मा हे पोलीस सेवेत असताना लेखक हुसेन जैदी हे त्यांना भेटले होते. या भेटी दरम्यान प्रदीप शर्मा यांच्याकडे हुसेन जैदी यांनी त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित ऑपरेशन च्या बाबतीतील माहिती व काही कागदपत्रांची मागणी केली होती. प्रदीप शर्मा यांनी दिलेली माहिती व कागद पत्रांच्या आधारावर हुसेन जैदी यांनी ' द अनटोल्ड स्टोरी ऑफ एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा' नावाचे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या आधारावर काही काल्पनिक गोष्टी जोडत 'द क्लास ऑफ 83' हा चित्रपट बनविण्यात आला आहे.
प्रदीप शर्मा यांच्या म्हणण्यानुसार या प्रकाराचा चित्रपट बनविण्यावर त्यांचा कुठलाही आक्षेप नाही. मात्र, या चित्रपटाच्या माध्यमातून पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जात असेल तर ते चुकीचे आहे. या साठी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रदीप शर्मा यांना दाखविण्यात यावा म्हणून त्यांनी मागणी केली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर जर त्यात काही चुकीचे आढळल्यास त्यास प्रदीप शर्मा हे विरोध करतील, असे या नोटीसमध्ये त्यांनी म्हटले आहे.
चित्रपट 'क्लास ऑफ 83'च्या विरोधात प्रदीप शर्मा यांची नोटीस - mumbai bollywood latest news
2018 साली प्रदीप शर्मा हे पोलीस सेवेत असताना लेखक हुसेन जैदी हे त्यांना भेटले होते. या भेटी दरम्यान प्रदीप शर्मा यांच्याकडे हुसेन जैदी यांनी त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित ऑपरेशन च्या बाबतीतील माहिती व काही कागदपात्रांची मागणी केली होती. प्रदिप शर्मा यांनी दिलेली माहिती व कागद पत्रांच्या आधारावर हुसेन जैदी यांनी ' द अनटोल्ड स्टोरी ऑफ एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा' या नावाचे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या आधारावर काही काल्पनिक गोष्टी जोडत 'द क्लास ऑफ 83' हा चित्रपट बनविण्यात आला आहे.