मुंबई - नवाब मलिक यांची कन्या आणि ड्रग्ज प्रकरणात आठ महिने तुरुंगात राहिलेले त्यांचे जावई समीर खान यांची पत्नी निलोफर यांनी एक पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी समीर खान यांच्या अटकेनंतर समाजाचा त्यांच्याकडे आणि त्यांच्या मुलांकडे पाहाण्याचा दृष्टीकोण कसा बदलला. त्यांना आणि त्यांच्या मुलांना कसा अपमान सहन करावा लागला. या प्रकरणात एनसीबीकडे कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली. याचा त्यांच्या आयुष्यावर कसा वाईट परिणाम झाला आहे. असाच अन्याय इतर कोणावर झाला असेल तर त्यांनी पुढे यावे आणि आमच्यासोबत लढा द्यावा, असे आवाहन निलोफर यांनी खुल्या पत्रातून केले आहे. निलोफर यांचे पती समीर खान यांना एनसीबीने अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जानेवारीत अटक केली होती.
नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र
हा तपास आता एनसीपीच्या एका अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशासकीय वर्तुळातही याबाबत दबक्या आवाजात बोलले जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत ही आपली बाजू लावून धरली होती. त्यानंतर या प्रकरणात विविध घडामोडी घडत गेल्या. दरम्यान नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र नवाब मलिक यांचे जावई आणि निलोफर मलिक-खान यांचे पती समीर खान यांनाही एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणावर आतापर्यंत मौन बाळगलेल्या निलोफर यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पत्र लिहीत निलोफर यांनी म्हटले आहे की लोकांनी आपल्याला ड्रग्ज पेडलरची बायको म्हणून हिणवलं. माझ्या मुलांच्या मित्रांनीही त्यांच्याशी नाते तोडले.
नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र जानेवारीत एनसीबीने समीर खान यांना अटक केली. त्यानंतर आमच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांना काहीही सापडले नाही. तरीही खान यांना साडे आठ महिने तुरुंगात घालवावे लागले. या दरम्यान आपण प्रचंड मानसिक तणावातून गेल्याचं निलोफर यांनी पत्रातून मांडलं आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी खान यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. परंतु तिथं प्रसार माध्यमांचे फोटोग्राफर आणि कॅमेरामॅन आधीपासून कसे उपस्थित होते, असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. सलग १५ तास चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला अटक केली. मात्र अटकेचे कारण स्पष्ट केले नव्हते. तो काळ माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत तणावाचा होता. आमची जी अवस्था झालेली ती शब्दात मांडणे कठीण आहे असे निलोफर यांनी पत्रात लिहिले आहे.
नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र निलोफर यांच्या पत्राची सोशल मीडिया, राजकीय वर्तुळ आणि समाजातही चर्चा सुरु आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरण काढून घेण्यात आले. या प्रकरणाच्या तापासाची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की कोणीही जनतेला गृहीत धरु नये. जे गुन्हेगार आहेत, अपराधी आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. इतरांनाही मी अवाहन करेन की त्यांनी पुढे यावे आणि आमच्यासोबत लढा द्यावा. निलोफर यांनी सोशल मीडियात लिहिलेल्या या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे.