ETV Bharat / city

मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी 2 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात 14 एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : May 31, 2021, 10:38 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात 14 एप्रिलपासून लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरी मुंबईत रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

दुकानांचा वेळ वाढला -

मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आणि आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. मुंबईत फेब्रुवारी दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेदरम्यान 14 फेब्रुवारीपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल आणि होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली होती. गेल्या महिन्यात मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 हजारापर्यंत गेली होती. हो संख्या सध्या हजारावर आली आहे. यामुळे पालिकेने 1 जून पासून दुकानांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक परिपत्रक काढले आहे.

काय आहे परिपत्रकात -

१) अत्यावश्यक दुकाने सकाळी ७.०० ते दुपारी २.०० पर्यंत सर्व दिवस उघडी राहतील.

२) आवश्यकतेतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते दुपारी २.०० पर्यंत पुढील व्यवस्थेनुसार उघडी राहतील

- पहिल्या आठवडयात रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील तर रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील.

- त्या पुढील आडवडयात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील व रस्त्याच्या उजवीकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील.

- अशाच पध्दतीने पुढील आडवडयांत दुकाने उघडी राहतील.

- शनिवार व रविवारी आवश्यकतेतर दुकाने पूर्णतः बंद राहतील.

3) ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तुं बरोबर आवश्यकतेतर वस्तुंचे वितरण करण्यास परवानगी असेल.

४) राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (२००५ चा ५३ वा कायदा) किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले 'ब्रेक-द-चेन' बाबतचे आदेश अस्तीत्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

हेही वाचा - रामदास आठवलेजी तुम्ही केंद्रात मंत्री आहात, आता तुम्हीच महाराष्ट्राला मदत आणून द्या - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.