मुंबई - मुंबईमध्ये गणेश विसर्जन दरम्यान गिरगाव चौपाटी ( Millions of devotees throng Girgaon Chowpaty ) परिसरात लाखो भाविकांची गर्दी होते. हे भाविक जवळचे रेल्वे स्टेशन असलेल्या चर्नी रोड रेल्वे स्थानकात येवून आपला ( devotees at Charni Road railway station ) पुढील प्रवास करतात. त्याची पुनरावृत्ती आज चर्नी रोड रेल्वे स्थानक घडली असती, एवढी ( Elphinstone incident repetition ) गर्दी जमली होती.
गणेश विसर्जनानंतर रात्री ७.३० ते ८ वाजता भाविक रेल्वे स्टेशनकडे गेले असता रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी भाविकांना अडवून ठेवून सदर स्टेशनमधून प्रवास करू नका मरीन लाईन स्टेशनचा वापर करा, गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे, असे सांगण्याचा प्रयत्न होते. मात्र त्यानंतरही भाविकांची गर्दी वाढतच जात होती. मरीन लाईन्सच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांनी ( Ganesh immersion procession in Mumbai ) चर्नी रोड स्थानकातील चर्चगेट दिशेकडील पुढील ब्रिजने रेल्वे स्थानकात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. येथे गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणीही नव्हते. याआधीही पश्चिम रेल्वेवर एल्फिस्टन स्थानकात चेंगरा चेंगरीची घटना घडली होती.
काय होती एल्फिस्टन दुर्घटना? एल्फिस्टन दुर्घटना २९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ही दुर्घटना घडली होती. परळ ते एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाला जोडलेला हा पूल अरूंद असल्याने लोकांची गर्दी या पूलावर होती. सततधार पाऊस असताना पुलावर गर्दीत चेंगराचेंगरी झाली. घाबरलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. ही घटना घडली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. या परिसरात रहिवाशांना सर्वप्रथम चेंगराचेंगरी होत असल्याची घटना अफवा वाटली होती. अशी घटना मुंबईने पहिल्यांदाच बघितली. मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारने थोडीफार मदत केली. मात्र अनेकांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमाविला होता. त्यामुळे आजही त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. या घटनेनंतर गेल्या तीन वर्षांत एलफिस्टन ठिकाणी मोठे बदल झालेले आहेत. मात्र, मुंबईत असे अनेक अरुंद रेल्वे पूल आहेत. त्याठिकाणी दुर्घटना घडल्यावरच सरकार व प्रशासनाला जाग येईल का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.
अनेक स्थानकांत अरुंद पूल मुंबईत अनेक स्थानकांत अरुंद पूल आहेत. तसेच लोकांच्या ये-जा करण्यासाठी रेल्वे स्थानक व मुख्य रस्त्यांना जोडणारे पादचारी पूल आहेत. हे पूल मुंबईत धोक्याच्या परिस्थितीत आहेत. यावर रेल्वे, महापालिका व राज्य प्रशासनाकडून पुलांचे लेखापरीक्षण झाल्याचे सांगण्यात येते. हे काम लवकरच होईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र, मुंबईत गोखले पूल, एलफिस्टन पूल अशा दुर्घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते हे वास्तव नाकारता येणार नाही.